इथेनॉल धोरण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय संकल्पना आणि अमित शाह यांचे धोरणात्मक बळ-राजकीय हेतूने नितीन गडकरींवर होणारे आरोप हा षडयंत्राचा भाग-किशोर तिवारी
प्रेस नोट
इथेनॉल धोरण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय संकल्पना आणि अमित शाह यांचे धोरणात्मक बळ-राजकीय हेतूने नितीन गडकरींवर होणारे आरोप हा षडयंत्राचा भाग-किशोर तिवारी
नागपूर | ५ ऑगस्ट २०२६
देशाचे इंधन परावलंबत्व कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 'इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम' (EBP) ही अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योजना सुरू केली. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे आज देशातील साखर कारखाने आणि कृषी उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना, केवळ राजकीय हेतूने केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्यावर होणारे आरोप पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत,अशी खंत विदर्भाचे प्रमुख शेतकरी नेते व कृषी क्षेत्राचे अभ्यासक किशोर तिवारी व्यक्त केले आहे कारण विदर्भात एक टक्का ही इथेनॉल उत्पादन होत नाही व या दूषित प्रचारामुळे महाराष्ट्राचे एक मोठे नेतृत्व विकासाचा महामेरू नितीन गडकरी यांचा राजकीय बळी घेण्याचा डाव रचला जात असुन याला अख्ख्या महाराष्ट्राची नाहीतर भारताची जनता विरोध करेल असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला .
१. इथेनॉल क्रांतीचे खरे शिल्पकार: नरेंद्र मोदी सरकार आणि अमित शाह यांचे नेतृत्व
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढाकार: मा. पंतप्रधानांनी भारताचे इंधन आयात बिल कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी २०% इथेनॉल ब्लेंडिंगचे (EBP) लक्ष्य २०३० ऐवजी २०२५-२६ पर्यंत पूर्ण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
- केंद्रीय सहकार मंत्री मा. अमित शाह यांचे योगदान: सहकार क्षेत्रात इथेनॉल निर्मितीला गती देण्यासाठी मा. अमित शाह यांनी स्वतः पुढाकार घेतला. देशभरातील अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या आधुनिक इथेनॉल प्रकल्पांचे उद्घाटन मा. अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे. त्यांनी सहकार क्षेत्राला इथेनॉल उत्पादनाकडे वळवून हजारो सहकारी कारखान्यांना आणि लाखो शेतकऱ्यांना दिवाळखोरीतून वाचवले आहे.
- सरकारी तेल कंपन्यांची भूमिका: केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या इंडियन ऑइल IOCL, भारत पेट्रोलियम BPCL आणि हिंदुस्थान पेट्रोलियम HPCL या सरकारी कंपन्या थेट निविदा (Tender) प्रक्रियेद्वारे पारदर्शक पद्धतीने इथेनॉलची खरेदी करतात,यामध्ये इथेनॉल ट्रम्प करार अंतर्गत अमेरिकेपासुन अंबानी , कर्नाटकातील भाजपचे प्रमुख इथेनॉल उत्पादक आणि अमित शाह यांच्या जवळचे भाजप नेते डॉ. मुरगेश आर. निराणी सह काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट), सपा, RLD, DMK, JDU यांसह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या थेट भागीदाऱ्या आहेत मात्र इथेनॉल म्हणजे नितीन गडकरी हे समीकरण जे समाज माध्यमांनी आता गोदी मीडिया जे उभे केले आहे हा नितीन गडकरी "४० वर्षे निष्कलंकपणे देशसेवा करणाऱ्या आणि विकासाचे जाळे विणणाऱ्या नेत्यावर केलेला राजकीय हल्ला" असुन गडकरींचे ४० वर्षांचे योगदान व विकासाचे राजकारण संपविण्याचा प्रकार असुन यामुळे भारताचे अपरिमित नुकसान होणार आहे अशी भीती किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली .
२. अधिक इथेनॉल उत्पादनावरून निर्माण केला जाणारा वाद हा राजकीय षडयंत्र!
आज देशात इथेनॉल निर्मिती वाढल्यामुळे काही राजकीय घटकांकडून विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. मात्र, यामागील आकडेवारी आणि सत्य खालीलप्रमाणे आहे:
- नितीन गडकरी कुटुंबाचा वाटा १% पेक्षा कमी: देशात ५०१ पेक्षा जास्त कंपन्या सरकारी तेल कंपन्यांना इथेनॉल पुरवठा करतात. वर्षाला १.७२ लाख कोटी रुपयांचा हा व्यवसाय आहे. या एकूण उत्पादनात मा. नितीन गडकरी यांच्याशी संबंधित प्रकल्पांचा वाटा १% पेक्षाही कमी आहे.
- ९९% उत्पादन सर्वपक्षीय नेत्यांच्या कंपन्यांचे: देशातील सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादक कंपन्यांमध्ये (उदा. श्री रेणुका शुगर्स, बलरामपूर चिनी, त्रिवेणी इंजिनिअरिंग, बजाज हिंदुस्थान, इत्यादी) तसेच देशभरातील सहकारी कारखान्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (दोन्ही गट), सपा, RLD, DMK, JDU यांसह अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या थेट भागीदाऱ्या आहेत.
- अन्नदात्याला 'ऊर्जादाता' बनवणारे धोरण: इथेनॉल निर्मितीमुळे आज ऊस उत्पादक, मका आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांना थेट आधार मिळाला आहे. साखर कारखान्यांची थकबाकी वेळेवर चुक्ती होत आहे.
३. ९९% इथेनॉलचे उत्पादक सोडून १% पेक्षा कमी इथेनॉलचे उत्पादन वाल्याला टार्गेट करणे एक मूर्खपणा
जर देशातील ९९% इथेनॉलचे उत्पादन इतर खाजगी उद्योग समूह, सरकारी कंपन्या आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संबंधित कारखाने करत असतील, तर केवळ १% पेक्षा कमी वाटा असलेल्या नितीन गडकरींवरच निशाणा का साधला जात आहे?हा प्रकार म्हणजे "४० वर्षे निष्कलंकपणे देशसेवा करणाऱ्या आणि विकासाचे जाळे विणणाऱ्या नेत्यावर केलेला राजकीय हल्ला" आहे,असा आरोप किशोर तिवारी आईनी केला आहे .
४. नितीन गडकरींचे ४० वर्षांचे योगदान - विकासाचे राजकारण
नितीन गडकरी १९७८ पासून उद्योजक असून नेहमीच विकासाचे राजकारण करतात त्यांना
- हायवे मॅन ऑफ इंडिया: केंद्रीय मंत्री म्हणून ५०,००० किमीपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग, दररोज ३७ किमी रस्ते बांधण्याचा जागतिक विक्रम, अटल टनेल, झोजिला टनेल, चारधाम महामार्ग प्रकल्प.
- महाराष्ट्राचे नवनिर्माण: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपूल, नागपूर मेट्रो, मिहान (MIHAN), AIIMS आणि २४ तास पाणी योजना.
- ॲग्रो व्हिजन: विदर्भातील शेतकऱ्यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कृषी क्रांती आणि हरित इंधनाचा पाया रचला.या सर्व कामांचे श्रेय दिले जात आहे यामुळेच त्यांचा राजकीय बळी घेण्याचा डाव असुन इथेनॉल धोरण हे मोदी सरकारचे राष्ट्रीय धोरण आहे आणि त्यामुळे देश समृद्ध होत आहे. १% च्या खोट्या आणि मनघडंत आरोपांनी नितीन गडकरी यांच्या ४० वर्षांच्या प्रामाणिक तपश्चर्येला डाग लावता येणार नाही. नागपूरची जनता आणि देशातील बळीराजा मा. नितीन गडकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व राहणार असा विश्वास किशोर तिवारी व्यक्त केला .
================================================

Comments
Post a Comment