Posts

Showing posts from February, 2026

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी

Image
भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी  दिनांक-११ फेबु २०२६ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांच्या कार्यालयाने अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारासाठी एक अंतरिम मसुदा  जारी केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त विदर्भ ,मराठचाडा व उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १ कोटी २० लाख शेतकऱ्यांवर विपरीत  परिणाम होणार असुन भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे हित अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये सुरक्षित असल्याचा दावा फोल ठरला असुन यामुळे कापसाच्या सोयाबीनच्या व इतर तेलबियांची किमती पडतील अशी भीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली आहे  शुल्कमुक्त कापसाच्या आयातीचा  करारामुळे महाराष्ट्राचे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील   अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये विदर्भ मराठवाड्यातमध्ये उत्पादन होणाऱ्या लांब स्टेपल कापसाच्या आयातीला परवानगी दिली आहे शुल्कमुक्त आयातीची परवा...

जून २०२६ मध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये ग्रामीण बचत गटांवरील कर्जांचा समावेश करा -किशोर तिवारी

Image
जून २०२६ मध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये ग्रामीण बचत गटांवरील कर्जांचा समावेश करा -किशोर तिवारी  दिनांक -९ फेबु २०२६ महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या २०२६ मध्ये जून महिन्यातील प्रस्तावित कर्जमाफीमध्ये सध्या शेती साठी पीककर्ज वाटप शेतकऱ्यांचे गट व देवाभाऊ यांच्या 'लाडक्या बहिणींच्या' नावावर बचतगटाच्या नावावर कृषी कर्ज मायक्रो फायनान्स कंपन्या ,सरकारी बँका,नागरी बँका व पत संस्था यांनी दिलेले पीककर्जाचे समावेश करण्यात यावा अशी मागणी नापिकीग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी मागील ३० वर्षांनी लढणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी प्रस्तावित कर्ज माफी स्थापन केलेल्या प्रविणसिंग परदेशी समितीकडे दिला आहे . मायक्रो फायनान्स कंपन्या व नागरी बँका नागरी  पत संस्था यांचे ६० टक्के कृषी कर्ज वाटप  सहकारी व सरकारी बँका यांचे पीककर्ज वाटप  पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात फक्त ४० टक्के असुन शेतीसाठी लागणारे भांडवल  मायक्रो फायनान्स कंपन्या व नागरी बँका ,नागरी  पत संस्था यांचे ६० टक्के कृषी कर्ज वाटप करीत असुन या सर्व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना सरकारी प...

जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -केंद्र सरकारचे कृषी धोरण जबाबदार -किशोर तिवारी

Image
जानेवारी महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात २२  शेतकऱ्यांच्या आत्महत्या -केंद्र सरकारचे कृषी  धोरण जबाबदार -किशोर तिवारी   दिनांक २ फेबुवारी २०२०६ ज्या वेळेस भारताचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन २०२६-२७ चे कृषी निधी कमी करून आपला भारत विश्व गुरु व सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी अर्थ संकल्प सादर करीत होत्या त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्या प्रशासन जानेवारी महिन्यात झालेल्या आदिवासी दलीत मागासवर्गीय अल्प भूधारक कोरडवाहू नापिकीग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या माध्यमांना देत होते . एकट्या जानेवारी २०२६ महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात २२  शेतकऱ्यांनी आपल्या दुर्दैवी आत्महत्या केल्या असल्याची माहिती शेतकरी  आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य  करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी दिली आहे . जिल्हा प्रशासनानुसार  ज्या २२  शेतकऱ्यांनी आपल्या दुर्दैवी आत्महत्या केल्या आहेत त्यांची नावे या प्रमाणे आहेत  १) विलास जुनघरे ससाणी तालुका घाटंजी , २)प्रशांत गुढे परसोडा तालुका आर्णी , ३)धीरज सामृतवार सुसरी तालुका केळापूर  ४) सचिन मरस्कोल्हे...