भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी

भारत-अमेरिका व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढणार -किशोर तिवारी 

दिनांक-११ फेबु २०२६

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांच्या कार्यालयाने अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारासाठी एक अंतरिम मसुदा  जारी केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त विदर्भ ,मराठचाडा व उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १ कोटी २० लाख शेतकऱ्यांवर विपरीत  परिणाम होणार असुन भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे हित अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये सुरक्षित असल्याचा दावा फोल ठरला असुन यामुळे कापसाच्या सोयाबीनच्या व इतर तेलबियांची किमती पडतील अशी भीती विदर्भाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली आहे 

शुल्कमुक्त कापसाच्या आयातीचा  करारामुळे महाराष्ट्राचे कापूस उत्पादक शेतकर्यांच्या आत्महत्या वाढतील  

अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये विदर्भ मराठवाड्यातमध्ये उत्पादन होणाऱ्या लांब स्टेपल कापसाच्या आयातीला परवानगी दिली आहे शुल्कमुक्त आयातीची परवानगी दिली आहे .भारत सध्या कापसाच्या आयातीवर ११% शुल्क लादतो आणि अमेरिका जो जगातील सर्वात मोठ्या फायबर निर्यातदाराकडून शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिल्याने देशांतर्गत किमतींवर दबाव येऊ शकतो याचा  परिणाम महाराष्ट्राचे कृषी संकटावर विहार असल्याची  भीती व्यक्त करीत सध्या कापसाच्या आयातीवर निर्बंध टाकण्याची मागणी किशोर तिवारी केली आहे .

अमेरिकेतून सोयाबीन तेलाच्या शुल्कमुक्त आयात महाराष्ट्रातील तेलबियांउत्पादक याना घातक 

महाराष्ट्र,,मध्यप्रदेश गुजरात हे प्रमुख सोयाबीन ,भुईमूग सरकीचे तेलबियां उत्पादक राज्य आहेत परंतु या राज्यातील  उत्पादकता ही अमेरिकेपेक्षा प्रचन्ड प्रमाणात कमी आहे व पाम तेलाच्या आयातीमुळे अडचणीत आलेले शेतकरी या करारामुळे अडचणीत येतील .अमेरिकेतील तेलाची आयात वाढली तर देशांतर्गत तेलबिया प्रक्रिया करणारे उधोग आणि सोयाबीन उत्पादकांना तोटा होणार आहे यामुळे अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करार रद्द करणे काळाची गरज आहे 

अमेरिकेतून प्रथिनेयुक्त डिस्टिलर सुक्या धान्यांच्या सोल्युबल्स (डीडीजीएस) आयातीला परवानगी घातक 

देशात डिस्टिलर सुक्या धान्यांच्या सोल्युबल्स (डीडीजीएस)चा पुरवठा या करारामुळे आणखी वाढणार आहे  भारतातील इथेनॉल उत्पादक - आधीच निष्क्रिय क्षमतेशी झुंजत आहेत आणि देशाने त्यांचे 20% जैवइंधन मिश्रण लक्ष्य गाठल्यानंतर मागणी कमी होत आहे - त्यांना देशांतर्गत बाजारात DDGS विक्रीतून कमी उत्पन्न मिळू शकते.अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करारामध्ये भारताने अमेरिकेसमोर शेतकऱ्यांचे हित बाजुला ठेवले आहेत कारण भारतात आधीच DDGS चा अतिरिक्त पुरवठा आहे, ज्यामुळे सोयाबीन सारख्या तेलबियांची मागणी कमी होत आहे, तरी भारताने आपल्या तेलबियांची लागवड वाढवण्यासाठी आणि आयात रोखण्यासाठी कार्यक्रम लागू ठेवण्यासाठी अमेरिका आणि भारत यांनी व्यापार करार रद्द करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे 

================================================

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी