मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोरखधंदे तात्काळ रोखण्यासाठी व हजारो शेतकऱ्यांची कोट्यावधीच्या लुटीवर किशोर तिवारी आरबीआई सीबीआय सहकार सचिव यांचेकडे पुराव्यासह याचिका

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोरखधंदे तात्काळ रोखण्यासाठी व हजारो शेतकऱ्यांची    कोट्यावधीच्या लुटीवर किशोर तिवारी आरबीआई सीबीआय सहकार सचिव यांचेकडे पुराव्यासह याचिका 

दिनांक -१९ ऑक्टोबर २०२५


यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार, SLR डिफॉल्ट आणि 53 टक्क्यांपेक्षा जास्त एनपीए असलेल्या या बँकेने आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या भरतीसाठी तब्बल 35 ते 50 लाख रुपये मागण्यात येत असल्याचा गंभीर तक्रारींचे शपथपत्र व सर्व दस्तावेज मिळाल्यानंतर  या अभूतपूर्व भ्र्ष्टाचार सहकार विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संगममताने अनियंत्रितपणे सुरु केल्यानंतर प्रशासक नियुक्त करून रोखण्यासाठी भारतातील शेतकऱ्यांचे मागील ४० वर्षापासुन हितासाठी लढा देणारे  किशोर तिवारी यांनी 
आरबीआई सीबीआय सहकार सचिव  यांचेकडे शपथपत्रावर कायदेशीर याचीका दिनांक १५ व १६ ऑक्टोबरला अधिकृतपणे दाखल केली केली आहे.

जी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्व वसंतराव नाईक व स्वर्गीय उत्तमराव पाटील यांनी महाराष्ट्रात शिखरावर ठेवली होती ती  यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील  ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेने सादर केलेल्या अहवालानुसार, बँकेचे NPA प्रमाण ५४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे बँकेने अधिकृतपणे सादर केले आहेत त्यातच भरतीसाठी ठरविलेल्या नियमांनुसार बँकेचा NPA दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, अशी स्पष्ट अट असताना बँकेने ही मर्यादा मोडली असून, अशा परिस्थितीत भरती प्रक्रिया सुरू करणे हे बँक नियमानुसार बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत आहे व हा प्रकार भाजपच्या राज्यात सुरु असुन याला स्वर्गीय उत्तमराव पाटील यांचे सुपूत्र मस्तवाल भ्रष्ट निकामी अध्यक्ष मनीष पाटील व अलिबाबाची ४० संचालकांची टीम जबाबदार आहे असे या याचिकेत किशोर तिवारी यांनी शपथपत्रावर म्हटले आहे . 
आपल्या याचिकेत  मागील काही वर्षांत या बँकेत झालेल्या भरतींपैकी ९५ टक्के भरती बोगस झाल्याचे उघड झाले आहे. २०२०-२१ सालीही एका खाजगी कंपनीमार्फत झालेली भरती नंतर वादग्रस्त ठरली होती. आश्चर्य म्हणजे याच वादग्रस्त कंपनीलाच पुन्हा २०२५ साली भरतीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा मोठ्या रकमेची मागणी होत असल्याने भरतीत मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचे सहप्रमाणे म्हटले  आहे.शिपाई पदासाठी सुमारे ३५ लाख, तर लिपिक पदासाठी ५० लाख मागितले जात असल्याचे आरोप समोर आले आहेत.
गावागावात फिरणारे काही दलाल बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक शेतकरी आपली शेती गहाण ठेवून किंवा विकून मुलांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही परिस्थिती अत्यंत विनाशकारी आणि शोषण करणारी असल्याचे  तिवारी यांनी म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांत बँकेकडून SLR डिफॉल्ट झाल्याने RBI ने मोठा दंड लावला होता.
हा दंड संबंधित अधिकाऱ्यांकडून न वसूल करता शेतकऱ्यांच्या ठेवीतून भरल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार म्हणजे ठेवीदारांवर अन्याय असून, दोषी अधिकारी व संचालकांकडूनच ही रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. बँकेचे वैधानिक लेखापरीक्षण चंद्रपूर येथील वादग्रस्त सीए फर्मकडून करण्यात येते. हीच संस्था गेल्या काही वर्षांपासून संचालक मंडळाच्या म्हणण्यानुसार लेखापरीक्षण करत असल्याचा आरोप आहे.
आश्चर्य म्हणजे २०२५-२६ या वर्षासाठीही त्याच लेखापरीक्षकांची फेरनिवड करण्यात आली, ज्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बोगस कर्ज वितरण आणि अपहार प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडले आहे.
बँकेकडून दिलेल्या तारकुंपण कर्जांपैकी ९५ टक्के कर्जे बोगस असल्याचे स्पष्ट झाले असूनही, दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
तसेच पुसद येथील विभागीय कार्यालयात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार प्रकरणात ठोस कारवाई झालेली नाही. या सर्व प्रकरणांवर शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी थेट आरबीआई सीबीआय सहकार सचिव यांचेकडे तक्रार दाखल केली असून, बँकेतील घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून दोषी संचालकांना गजाआड टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ही बँक आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली असून, ती कधीही बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही वर्षात संचालकांनी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. वर्धा येथील सहकारी बँक अशीच बंद पडली. दिव्या बंद पडल्यास शेतकऱ्यांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागेल यासाठी हा प्रामाणिक प्रयन्त असुन या लढ्यात आमदार बाळासाहेब मांगुळकर ,बॅरीस्टर विनोद तिवारी , काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते भ्रस्टाचाराचा गर्दनकाळ संतोषराव बोरेले यांच्या यापुर्वी सादर तक्रारींचा संच व बँकेने उच्च्न्यायालयात सादर केलेल्या खोट्या शपथपत्राची जोड आपल्या याचिकेत केल्याची माहीती  किशोर तिवारी यांनी केली आहे.
=============================================

प्रति,
जिल्हा प्रतिनिधी,
महोदय वरील बातमी आपल्या प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रकाशित करावी, ही विनंती. 

आपलाच किशोर तिवारी

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी