Posts

“यवतमाळच्या गरीबांच्या घरकुलांचे तीन तेरा;१लाख७२हजार७०० मंजूर घरे अपूर्ण!सरकारने घरकुलांचा हिशेब द्यावा”-किशोर तिवारी

Image
“यवतमाळच्या गरीबांच्या घरकुलांचे तीन तेरा;१लाख७२हजार७०० मंजूर घरे अपूर्ण!सरकारने घरकुलांचा हिशेब द्यावा”-किशोर तिवारी यवतमाळ  -१८ सप्टेंबर २०२६ २०१९ मध्ये यवतमाळच्या भूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत प्रत्येक बेघराला घर देण्याचा विश्वास दिला. मात्र अधिकृत जिल्हा अहवालानुसार ३० जून २०२५ पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीणची २,३४,३४७ घरे मंजूर असून केवळ ६१,६४७ घरे पूर्ण झाली; तब्बल १,७२,७०० घरे अपूर्ण राहिली. मंजूर घरांपैकी जवळपास ७४ टक्के घरे अपूर्ण असतील, तर याला साधा प्रशासकीय अनुशेष म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. याहून गंभीर बाब म्हणजे— पहिला हप्ता शिल्लक- ७२,९८१, दुसरा हप्ता शिल्लक - ६५,४०९ तिसरा हप्ता शिल्लक- २०,२२३, ७२ हजारांहून अधिक मंजूर कुटुंबे पहिल्या हप्त्यावरच का अडकली? याचे लाभार्थीनिहाय उत्तर जिल्हा प्रशासनाने जनतेसमोर ठेवावे. पुसद, उमरखेड, महागाव, दारव्हा -सर्वाधिक अनुशेषाचा पट्टा पुसद — ३१,८४९, उमरखेड — २१,५६१, महागाव — १९,०२३, दारव्हा — १४,९५०, आर्णी — ११,४५०, दिग्रस — १०,६५५, घाटंजी — १०,३३०, केळापूर — ८,२९३, नेर — ८,०३१, यवतमाळ — ७,५९१, राळेगा...

नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी करा : किशोर तिवारी

Image
  नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची चौकशी करा  : किशोर तिवारी नागपूर :दिनांक १७ सप्टेंबर २०२६ ₹४४९ प्रतिटनपासून ₹१,९५० प्रतिटनपर्यंत पैसा वाढला; हजारो सफाई कामगार असूनही नागपूरच्या रस्त्यावर कचरा - सत्ताधारी, विरोधक, प्रशासन आणि कंत्राटदारांनी आता प्रत्येक रुपयाचा व प्रत्येक टनाचा हिशेब द्यावा : किशोर तिवारी “कंत्राटदारांना कोट्यवधी, चौकशी समित्यांवर चौकशा, दंडाच्या घोषणा; पण नागरिकांना कचरा आणि कामगारांना वेतन-विमा-कायमपणासाठी संघर्ष - ही ‘स्वच्छ नागपूर’ची व्यवस्था आहे की उत्तरदायित्वाचा कचरा?”  नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात गेल्या जवळपास दोन दशकांत झालेली कंत्राटांची वाढ, प्रतिटन दरातील प्रचंड बदल, वारंवार आकारलेले दंड, कचऱ्यात बांधकाम मलबा मिसळल्याची प्रकरणे, भांडेवाडीतील पर्यावरणीय समस्या, रखडलेले किंवा अपेक्षित परिणाम न देणारे प्रक्रिया प्रकल्प, कामगारांचे वेतन व सामाजिक सुरक्षेचे प्रश्न आणि एकामागून एक झालेल्या चौकशा पाहता आता केवळ आणखी एका चौकशी समितीने नागपूरकरांचे समाधान होणार नाही. नागपूरकरांना आता कागदावरील स्वच्छता नको; रस्त्यावर स्वच्...

पांढरकवड्याच्या एक कोटींच्या ‘नमो उद्यान’चे वर्षभरात तीनतेरा -वारंवार निविदा रद्द करण्यामागील संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करा -किशोर तिवारी

Image
  पांढरकवड्याच्या एक कोटींच्या ‘नमो उद्यान’चे वर्षभरात तीनतेरा -वारंवार निविदा रद्द करण्यामागील संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करा -किशोर तिवारी शासनाने एक कोटी रुपये मंजूर केले; ई-निविदा बंधनकारक; तरी मार्च ते ऑगस्ट २०२६ दरम्यान किमान चार निविदा प्रक्रिया - प्रत्यक्ष उद्यान कुठे? जिल्हाधिकारी, नगरपरिषद प्रशासन व नगरविकास विभागाने प्रत्येक निर्णय जनतेसमोर ठेवावा पांढरकवडा, जि. यवतमाळ | १७ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र शासनाने पांढरकवडा नगर परिषदेसाठी एक कोटी रुपये मंजूर करून आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले , तरी शहरातील चिंतामणी ले-आऊट, सेक्टर क्रमांक १ येथे प्रस्तावित ‘नमो उद्यान’ प्रत्यक्षात पूर्ण न होणे आणि त्याच कामासाठी मार्च ते ऑगस्ट २०२६ या काळात वारंवार निविदा प्रक्रिया राबविली जाणे ही अत्यंत गंभीर प्रशासकीय बाब असून या संपूर्ण प्रक्रियेची स्वतंत्र, वेळबद्ध आणि तांत्रिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केली आहे. शासनाच्या मूळ आदेशात पांढरकवड्यासाठी एक कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक नपावै-२०२५/प्र.क्र.२२४/...

पॅराक्वॉटवर तात्काळ संपूर्ण बंदी घाला;शेतकऱ्यांचा जीव रासायनिक उद्योगाच्या नफ्यापेक्षा मोठा नाही -किशोर तिवारी

Image
पॅराक्वॉटवर तात्काळ संपूर्ण बंदी घाला;शेतकऱ्यांचा जीव रासायनिक उद्योगाच्या नफ्यापेक्षा मोठा नाही -किशोर तिवारी नोंदणी समितीने संपूर्ण बंदीची शिफारस करूनही अंतिम आदेश का रखडला? कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातडीने अधिसूचना काढावी नागपूर, १६ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी नेते आणि जनहित कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी अत्यंत विषारी पॅराक्वॉट डाय-क्लोराइड च्या आयात, उत्पादन, वाहतूक, वितरण, विक्री आणि वापरावर देशव्यापी संपूर्ण बंदीचा अंतिम आदेश तातडीने जारी करण्याची मागणी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे. भारत सरकारच्या १० जुलै २०२६ च्या मसुद्यात पॅराक्वॉटच्या प्रतिकूल आरोग्यपरिणामांचा, विषबाधेच्या घटनांचा, उच्च मृत्युप्रमाणाचा आणि विशिष्ट प्रतिविष उपलब्ध नसल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. केंद्राच्या नोंदणी समितीने या कारणांवरून संपूर्ण बंदीची शिफारस केली असून, सरकारनेही मनुष्य व प्राण्यांच्या आरोग्याला असलेल्या धोक्यामुळे तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.  “सरकारची तज्ज्ञ प्रक्रिया पूर्...

नागपूरच्या ₹२,४२७ कोटींच्या ‘अमृत’ योजनेचे तीन तेरा करणारे गुजराथचे कंत्राटदार आले कसे- सारे भाजपचे आमदार नगरसेवक यांचे मौन कोणाच्या दबावाखाली : किशोर तिवारी

Image
 नागपूरच्या ₹२,४२७ कोटींच्या ‘अमृत’ योजनेचे तीन तेरा करणारे गुजराथचे कंत्राटदार  आले कसे- सारे भाजपचे आमदार नगरसेवक यांचे मौन  कोणाच्या दबावाखाली  : किशोर तिवारी नागपूर, १५ सप्टेंबर २०२६ नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशातील अमृत आणि अमृत २.०  योजनेमध्ये गुजराथचे कंत्राटदार यांनी खोदलेले रस्ते, सदोष सांडपाणी वाहिन्या, चुकीच्या उताराचे  रखडलेली कामे,पाणीपुरवठ्याचा खोळंबा दिसत असतांना भाजपचे आमदार नगरसेवक यांचे मौन  कोणाच्या दबावाखाली आहे असा सवाल सामाजीक कार्यकर्ते किशोर तिवारी केला आहे . नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशातील अमृत आणि अमृत २.० योजनेच्या जवळपास अडीच हजार कोटी रुपयांच्या कामांची स्वतंत्र, निष्पक्ष, तांत्रिक, आर्थिक आणि कार्यफल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी  किशोर तिवारी यांनी यावेळी केली आहे.केंद्र सरकारच्या अधिकृत नोंदींमध्ये नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशाशी संबंधित पाच प्रमुख प्रकल्पांची एकत्रित मंजूर किंमत सुमारे ₹२,४२७.२३ कोटी  आहे. तिवारी यांनी सवाल केला  की “अडीच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले म्हणजे...

नागपूरच्या ₹२,४२७ कोटींच्या ‘अमृत’चे तीन तेरा कोणी वाजवले - प्रत्येक रुपया, प्रत्येक कंत्राट आणि प्रत्येक किलोमीटर सांडपाणी वाहिनीचा हिशेब द्या : किशोर तिवारी

Image
  प्रसिद्धीपत्रक नागपूरच्या ₹२,४२७ कोटींच्या ‘अमृत’ योजनेचे तीन तेरा करणारे गुजराथचे कंत्राटदार   आले कसे- सारे भाजपचे आमदार नगरसेवक यांचे मौन  कोणाच्या दबावाखाली   : किशोर तिवारी नागपूर, १३ सप्टेंबर २०२६ नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशातील अमृत आणि अमृत २.०  योजनेमध्ये  गुजराथचे कंत्राटदार यांनी  खोदलेले रस्ते, सदोष सांडपाणी वाहिन्या, चुकीच्या उताराचे  रखडलेली कामे,पाणीपुरवठ्याचा खोळंबा दिसत असतांना  भाजपचे आमदार नगरसेवक यांचे मौन  कोणाच्या दबावाखाली आहे असा सवाल सामाजीक कार्यकर्ते किशोर तिवारी केला आहे . नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशातील  अमृत आणि अमृत २.० योजनेच्या  जवळपास अडीच हजार कोटी रुपयांच्या कामांची स्वतंत्र, निष्पक्ष, तांत्रिक, आर्थिक आणि कार्यफल तपासणी करण्यात यावी , अशी मागणी   किशोर तिवारी यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत नोंदींमध्ये नागपूर शहर आणि नागपूर महानगर प्रदेशाशी संबंधित पाच प्रमुख प्रकल्पांची एकत्रित मंजूर किंमत सुमारे ₹२,४२७.२३ कोटी  आहे. तिवारी यांनी स...