यवतमाळ जिल्ह्यात पीकविमा नाकारल्यामुळे मारेगाव तालुक्यात ७२ तासात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शेतकऱ्यांना उभारी देणाऱ्या सरकारला तुतारी लावण्याची वेळ आली -किशोर तिवारी दिनांक २ फेबुवारी २०२०६ यावर्षी सतत पाऊसाने प्रमुख नगदी कापुस सोयाबीन बुडल्यामुळे व सततची नापीकी बँकांनी पिकर्ज न दिल्यामुळे कर्जबाजारी कोरडवाहू मारेगाव तालुक्यात मागील ७२ तासात ३ दुर्दैवी आत्महत्या केल्या असल्याची माहिती शेतकरी आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी दिली आहे .जिल्हा प्रशासनानुसार या तीन शेतकऱ्यांची नावे पार्डी येथील कैलास गाडगे सुर्ला येथील विलासभाऊ मेश्राम तर गोरज येथील युवा शेतकरी अविनाश पानघाटे असुन हे आदीवासी दलित मागासवर्गाचे असुन यवतमाळ जिल्ह्यात २०२६ मध्ये आजपर्यंत सरकारी आकडेवारी नुसार ६४ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारी मुळे आत्महत्या केल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यात २०२६ मधे ६४ शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त भाड्याने यांच्या नावाने सातबारा नाही म्हणुन सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद शेतकरी आ...