Posts

Showing posts from May, 2026

यवतमाळमध्ये 2026 मध्ये 102 शेतकरी आत्महत्या - सरकारची उदासीनता व निष्क्रियता उघड;तात्काळ हस्तक्षेप करणे ही काळाची गरज – किशोर तिवारी

Image
यवतमाळमध्ये 2026 मध्ये 102 शेतकरी आत्महत्या - सरकारची उदासीनता व  निष्क्रियता उघड;तात्काळ हस्तक्षेप करणे ही काळाची गरज  – किशोर तिवारी दिनांक:०८/०४/२०२६ विदर्भातील ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी यवतमाळ जिल्ह्यात २०२६ वर्षात नोंदवण्यात आलेल्या तब्बल १०२ शेतकरी आत्महत्यांबाबत तीव्र संताप व्यक्त करत, ही परिस्थिती केवळ दुर्दैवी नसून शासनाच्या पूर्णपणे अपयशी आणि  यंत्रणेचे जिवंत उदाहरण आहे, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, या आत्महत्या नैसर्गिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे नसून, थेट चुकीच्या धोरणांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेल्या आहेत, त्यामुळे या मृत्यूंची नैतिक जबाबदारी सरकारवरच येते. तिवारी यांनी म्हटले की, “यवतमाळमध्ये २०२६ मागील ४ महिन्यांत १०२ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत हे आत्महत्येचे सत्र २००१ पासुन सुरु असुन आत्ता पर्यंत  ६६२२ कर्जबाजारी शेतकऱ्यांनी   असताना केली असतांना सरकार शांत बसले आहे, ही बाब अत्यंत गंभीर असून, जर तात्काळ हस्तक्षेप केला गेला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि व्यापक आंदोलन उभे राहील.”...