१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार
१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार
दिनांक - ३० ऑक्टोबर २०२५
१० हजार पीयू लेदर बॅगचे भाऊबीजेच्या ओवाळणीत बहिणींना पांढरकवड्यात अभूतपुर्व वाटत
प्रत्येक वर्षी "आपला भाऊ किशोर भाऊ" या मागील सहा वर्षापासुन उपक्रम चालविणारे अंकित नैताम यांनी सर्व गरीब बहिणींना दानशुर किसान भाऊ बोरले यांच्या पुढाकाराने व सहकार्याने २६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर वाटपाचे आयोजन केले असुन या उपक्रमाला अभुतपुर्व यश आले असुन या पुर्वी "आपला भाऊ किशोर भाऊ " पैठणी सिल्क साडीची ओवाळणी १० हजार बहिणीला २ वर्षापूर्वी केली होती .
पडद्याच्या मागे राहून प्रसिद्धी पासुन सुरू राहुन किसनभाऊ बोरेले यांची समाजसेवा
आचार्य सत्यनारायण गोयन्का यांच्या शिष्य विपक्षणा साधनेचे साधक किसनभाऊ बोरेले यांनी पडद्यामागे राहून जे समाजसेवेचे काम सुरु केले आहे त्याच्या पासुन समाजसेवकांनी व कोट्यावधी रुपये कमावलेल्या राजकीय नेत्यांनी शिकावे . विपक्षक किसनभाऊ बोरले यांनी आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथील डोंगरे बाबा यांच्या वृद्धाश्रम येथे ५० लाख रुपयाचे दोन हॉल व १ एकरावर वॉल कंपाउंड बांधणी केली आहे व अशी मदत ते अनेक ठिकाणी करीत आहेत मात्र याची प्रसिद्धी टाळण्यास सांगतात . करोना महामारीत काळात पांढरकवाडा येथे प्रसिद्धीच्या मागे न लागता लाखो रुपये किट वाटपासाठी दिले.केळापूर तालुक्यातील कोपामांडवी येथील शेतकरी विधवा गीता चिंचोळकर यांच्या मुलीच्या लग्नात मुलीच्या कन्यादानासाठी ५१ हजाराची मदत दिली मात्र माझे नाव पुढे येणार नाही याची अट घातली होती यावर्षी सुद्धा १ कोटी रुपयाच्या मदतीमध्ये सिंहाचा वाटा त्यांचा असुन एकाही पोडावर कोणीही उपाशी राहणार नाही मदत चालू ठेवा असा आदेश दिला ,एक प्रसिद्धी दररोज प्रेस काढणारे नेते तर एकीकडे आपल्या संपत्तीच्या २५ टक्के खर्च करणारे किसनभाऊ बोरेले हा कामाच्या माहिती आपण आज जाणीवपूर्वक देत असल्याचे किशोर तिवारी यांनी आज दिवाळी वाटप मध्ये कार्यक्रमात दिली .
==================================================


Comments
Post a Comment