विदर्भात सहा दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या - मृत्यूचे तांडव थांबवण्यासाठी आता समाजानेच पुढे यावे-किशोर तिवारी
विदर्भात सहा दिवसांत दहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या - मृत्यूचे तांडव थांबवण्यासाठी आता समाजानेच पुढे यावे- किशोर तिवारी दुष्काळाने शेती उद्ध्वस्त, कर्जाने संसार उद्ध्वस्त; सरकारच्या घोषणांचा बाजार, विरोधकांचे राजकारण आणि प्रशासनाच्या दिरंगाईत शेतकरी जगण्याचा आधार गमावतोय! महाराष्ट्रातील ३०५ तालुक्यांत दुष्काळाचे संकट; सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना मदतीची गरज — आता समित्या, परिषदा आणि भाषणे नकोत, थेट गावात जाऊन मदत करा! "तीस वर्षांचा संघर्ष, पण आता संघर्षापेक्षा शेतकऱ्याचा जीव महत्त्वाचा! राजकीय मतभेद, अहंकार आणि पूर्वग्रह बाजूला ठेवून सरकारसोबत काम करण्यास तयार!" — किशोर तिवारी "डॉक्टर, अभियंते, वकील, उद्योगपती, व्यापारी, दुकानदार, कर्मचारी आणि संवेदनशील नागरिकांनो, गावाकडे चला! संकटातील शेतकऱ्यांना जगण्याचा आधार द्या; या कठीण संकटाचे सोने करूया!" १ नोव्हेंबर २०२६ विदर्भातील दुष्काळ, नापिकी, वाढता कर्जबोजा, शेतमालाच्या कोसळणाऱ्या किमती आणि शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर पार्श्वभूमीवर विदर्भ जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे माजी अध्य...