शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी
शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी
दिनांक -२६ सप्टेंबर २०२५
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सामाजिक जीवनात आलेल्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी आपले सुविद्य पती अनिश दमानिया यांच्यासोबत सर्व नियम धाब्यावर ठेऊन गैरमार्गाने व्यवहार करून कोट्यवधींची संपत्ती अर्जित केली असुन त्यांना अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा निधी पोटभरू धंदे करण्यासाठी वापरल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे माजी पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन केली नंतर आता श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया या काचेचा घरात राहुन दगड मारतात असल्याचा आरोप शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी केला आहे .
आपल्या सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांना खुलासा करण्यासाठी सादर केलेल्या प्रश्न्नावलीची करणे देतांना त्यांनी अंजली दमानिया यांनी २५ सप्टेंबरला २०२५ भारताचे परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये गडकरी मुलांच्या व म्हैसकर यांच्यावर केलेल्या अतिशय खोट्या आरोपामुळे व्यथित होऊन करीत असल्याचे म्हटले आहे . श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया या माझ्या मुलीसारख्या असुन त्या अतिशय प्रामाणिक आहेत हे समजुन मी हे प्रश्न त्याना विचारत आहे .
प्रश्न १- आपण २०१४ मध्ये निवडणूक अर्ज सादर करतांना खोटे शपथपत्र सादर केले आहे का ?
प्रश्न २- मौजे खर्वंडी ता. कर्जत, जि. रायगड कोंडिवडे गावातील अतिशय गरीब आदीवासी शेतकऱ्यांची ६६ एकर कोट्यवधींची जमीन गैर आदीवासी असतांना विकत घेतली आहे का ??? या जमिनी खरेदी करण्यासाठी आपण काळापैसा वापरला आहे का??
प्रश्न ३- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या सरकारी संस्थेवर आपले पती अनिश दमानिया यांची मानद सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली म्हणुन आपण त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यांच्या आदेशाने व अर्थ साह्याने नितीन गडकरी विरुद्ध ही मोहीम उघडलीय आहे अशी चर्चा खरी आहे का ???
प्रश्न ४- आपले पती अनिश दमानिया हे एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये संस्थात्मक इक्विटीचे प्रमुख असताना बाजारातील गैरव्यवहारात सहभागी होते. ५ ऑक्टोबर २०१२ रोजी कंपनीने १२५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे ₹७५० कोटी) किमतीचे ६० हून अधिक बनावट संस्थात्मक ऑर्डर दिले व या खोट्या व्यवहारांमुळे राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) वर गंभीर नुकसान झाले होते त्याची चौकशी सेबी करीत आहे का ????
प्रश्न ५-"अल्पाइन" नावाच्या रिअल इस्टेट प्रकल्पासह आपले अनेक एसआरए बांधकाम प्रकल्प यामध्ये बेनामी भागीदारी आहे का ?????
प्रश्न ६- आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त आहे हे दाखवुन सनदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकुन दलालीचे कामे मंत्रालयात करतात अशी होत असलेली चर्चा खरी आहे का ??????
प्रश्न ७ - देवाभाऊ यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांना इडी व सिबिआई यांची क्लीनचिट आपण कोणताच पुरावा व पाठपुरावा न केल्यामुळे मिळाली आहे ,हे खरे आहे का ???????
प्रश्न ८- आपण डिसेंबर २०१२ मध्ये नितीन गडकरी यांचे विरोधामध्ये २५ सप्टेंबर २०२५ पेक्षा गंभीर आरोप दिल्ली येथे अरविंद केजरीवाल प्रशांत भुषण यांच्या सोबत लावले होते नंतर मानहानी प्रकरणात आमचे सर्व आरोप बिनबुडाचे होते असे लेखी देऊन बिनशर्त हात जोडुन माफी मागितली होती ही गोष्ट खरी आहे का ????????
आज भारतीय राजकारणात सर्व नेते पोटभरू झाले आहेत व भ्रष्ट आहेत ,प्रशासनिक व्यवस्था कोडमडली आहे ,मुंबई तर सर्व नेते बिल्डर कंत्राटदार झाले आहेत अशा घाणीत श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया तुम्ही एकटे आशेचा किरण आहात पण आपल्या सार्वजनीक जीवनाविषयी असे पोटभरू प्रश्न उपस्थित झाल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने काय कर्वे हे सुचत नाही ,कृपया खुलासा करावा ही विनंती

Comments
Post a Comment