महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज -किशोर तिवारी
महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी व धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज -किशोर तिवारी
दिनांक -१२ जानेवारी २०२६
विदर्भात २०२५ मध्ये दररोज ४ मराठी शेतकरी आत्मह्त्या करीत असतांना "ठाकरे बंधू " यांना मराठी माणूस का आठवत नाही
महानगर पालिका निवडणुकीत ज्या मराठी माणसाच्या पश्चिम विदर्भात मागील वर्षी २००९ शेतकऱ्यांच्या होत असतांना एकदाही ढुंकूनही पहिले नाही ज्यांनी मुंबईमधून मराठी माणसाचे पलायन होत असतांना चक्क बध्याची भूमिका घेतली त्यांनी मराठी माणसाच्या नावाने तसेच नमाज व अजाणचा मुद्दा समोर करून मुसलमान समाजाला त्रास देणाऱ्या भाजपा व राज ठाकरे यांचा धर्मद्वेष-भाषाद्वेष रोखण्यासाठी महानगर निवडणुकीत फक्त काँग्रेसलाच मतदान करणे काळाची गरज असल्याचे किशोर तिवारी पत्रकाद्वारे मतदारांना आवाहन केले आहे .
अंबानीच्या मुलाच्या लग्नात नाचणारे व अडाणी कडून देणगी घेणारे "ठाकरे बंधु " यांचा गुजराथी विरोध हा एक दंभ
गौतम अडाणी यांचे कडुन वेळोवेळी देणगी घेणारे तर मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात नाचायला जाणारे यांचा अडाणी -अंबानी विरोध ही एक नूरा कुस्ती असुन मागील ३ वर्षात मुंबईची हजारो एकर जमीन अडाणीच्या घशात टाकतांना "ठाकरे बंधूंचे" मौन एक रहस्य आहे . मागील २५ वर्षात मुंबईच्या विकासावर धर्म भाषा जातीच्या मतदारांना मतदान मागणे सोडुन बिहारी उत्तर भारतीय गुजराथी तामीळ भाषीक लोकांना धमक्या देणे ही कृती भाजपा कडे अमराठी मतदारांना वळविण्याचा राज ठाकरे यांचा उधोग असुन सर्व धर्म भाषा जातीच्या मतदारांना या लोकशाही विरोधी हुकूमशाही आणणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस एकमेव पर्याय असुन येत्या निवडणुकीत काँग्रेसला मजबूत करण्याचे विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .
-----------------------------------------------------------------------------------------
.jpg)
Comments
Post a Comment