शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेजचे किशोर तिवारी कडून स्वागत

शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेजचे किशोर तिवारी कडून स्वागत 

दिनांक -८ ऑक्टोबर २०२५

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले त्याचे स्वागत महाराष्ट्राचे प्रमुख शेतकरी नेते किशोर तिवारी आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी पॅकेज घोषित करीत असतांना सुमारे १ कोटी हेक्टर शेतीची लागवड झाली त्याच्या पैकी राज्यातील  ३६ जिल्ह्यांपैकी २९ जिल्ह्यांमध्ये ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले मात्र उर्वरीत जवळपास २० लाख हेक्टरमध्ये परचंद नापिकी झाली असल्यामुळे त्यांचाहि विचार विस्तारित पॅकेज करावा अशी विनंती केली आहे    नुकसान भरपाई पॅकेजमध्ये २,०५९ महसूल विभागांमधील २९ जिल्हे आणि २५३ तालुके समाविष्ट आहेत सरकारने  राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे हे कबुल केले आहे यावरून हे कृषी संकट अभुतपुर्व असुन प्रशासकीय कारवाई दिवाळीपुर्वी करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी यावेळी केली 

या मदत पॅकेजमध्ये प्रति हेक्टर ४७,००० रुपये रोख रक्कम आणि मनरेगाद्वारे अतिरिक्त ३ लाख रुपये प्रति हेक्टर मदत समाविष्ट असेल. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील पशुधन, घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत.सरकारन उद्ध्वस्त घरे पुनर्बांधणीसाठी आणि नुकसान झालेल्या दुकानदारांना ५०,००० रुपयांची मदत जाहीर त्यामध्ये  पूरग्रस्त घरे पुनर्बांधणीसाठी आम्ही मदत करूहे आश्वासन ठोस नसुन तात्काळ मदत अपॆशीत आहे तर नुकसान झालेल्या दुकानदारांना ५०,००० रुपयांची मदत आणि पशुधनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सुद्धा अपुरी असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे . 
 “शेतकऱ्यांना येणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाची पूर्णपणे भरपाई कोणीही करू शकत नाही"देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाशी यांनी सहमती दर्शविली मात्र भ्रष्ट सनदी अधिकारी व सडलेली प्रशासकीय यंत्रणा यामुळे दिलेली मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही यावर आपल्या आमदारांना जबाबदारी देण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे . 
==================== 






Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी