नितीन गडकरी यांच्या विरुध्द "डिसेंबर २०१२ मध्ये बदनामीचे षडयंत्र" आता सप्टेंबर २०२५ मध्ये गुजराथ लॉबी ने माध्यमात पेरले - किशोर तिवारी

नितीन गडकरी यांच्या विरुध्द "डिसेंबर २०१२ मध्ये बदनामीचे षडयंत्र" आता पुन्हा "सप्टेंबर २०२५ मध्ये " गुजराथ लॉबी ने माध्यमात पेरले - किशोर तिवारी

दिनांक - ३१ ऑगस्ट २०२५

येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षे पूर्ण करीत असुन त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या नियमाप्रमाणे ते आपला पदभार सोडतील व संघ नितीन गडकरी यांचे नाव अमित शाह यांच्या जागी पुढे करेल ही चर्चा सुरु होताच ज्याप्रमाणे डिसेंबर २०१२ मध्ये नितीन गडकरी हे सलग भाजपा अध्यक्ष होतील व २०१४ मध्ये त्यांच्या नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुका होतील व पंतप्रधान पदाची धुरा त्यांना मिळेल हे निश्चित झाल्या बरोबर नोव्हेंबर -डिसेंबर २०१२ मध्ये नितीन गडकरी यांनी आपल्या तृप्ती समूहाच्या साखर कारखान्यासाठी मोठा सिंचन घोटाळा केला असा आरोप अरविंद केजरीवाल ,अंजली दमानिया सह काँग्रेस पक्षाने लावला होता मात्र पुढे हे सर्व आरोप खोटे सिद्ध झाले व अरविंद केजरीवाल यांनी बिनाशर्त माफी मागीतली होती हार कट गुजराथ लॉबी साठी लालकृष्ण अडवाणी ,अरुण जेटली ,सुषमा स्वराज्य ,मनोहर परीकर ,राजनाथ सिंग ,प्रकाश जावडेकर ,किरीट सोमय्या या भाजपा मधील अडवाणी रचला होता हे सत्य समोर आले होते आता ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ तसाच कट पुन्हा रचला जात असुन नितीन गडकरी ने पदाचा दुरुपयोग करीत आपली मुले निखिल व सारंग यांना शेकडो कोटींचा फायदा मिळवून दिला असल्याच्या बातम्या व भाडोत्री युट्युब वाल्यानी सूरी केला आहे या सर्व बातम्या प्रसारीत करण्यासाठी गोदी मीडिया साठी काम करणारी भाजपचा आयटी सेल असुन यावर शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे

नितीन गडकरी यांच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे व वेदनादायी

नितीन गडकरी मागील ४० वर्षांपासून कृषी घनकचऱ्या पासुन ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प चालवीत आहेत त्यावेळी निखिल व सारंग शाळेमध्ये होते जेंव्हा बायोगॅस चा प्रयोग पूर्णपणे ब्राझील सारख्या अनेक देशात यशस्वी झाल्यानंतर भारतात पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) ने संपुर्ण संशोधन करून बायोगॅसला पेट्रोलियम मिश्रित इंधनाची परवानगी दिली त्यानंतर इथनॉल वापर सुरु करण्यात आला आहे . इथेनॉल हा एक प्रमुख रासायनिक संयुग आहे. तो पेट्रोलमध्ये मिश्रण म्हणून, मद्यपान पदार्थांमध्ये, औषधांमध्ये व सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो.नितीन गडकरी यांचा २०१२ मध्ये तसेच आज २०२५ मध्ये पूर्ति समूहात काडीमात्र संबंध नव्हता .सध्या गडकरी पुत्र निखिल व सारंग यांनी बाजारातुन भांडवल उभे मानस व सीआयन ऍग्रो उधोग स्थापन केले व रांत्रदिवस मेहनत करून जागतिक स्तरावरील तंत्रद्यान आणुन शुद्ध बायोगॅस ची निर्माती सुरु केली व सोबतच या कंपन्या जागतिक स्तराच्या रम व व्हिस्कीचे ब्रँड बाजारात कंपनी कप्तान आणि होल स्टोन या नावाने विकत आहेत सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथनॉल ची परवानगी मिळाल्यानंतर बाजारात या कंपन्यांचे शेअर्स ३०० पट्टीने वाढले मात्र ही काल्पनिक आभासी किमंत आहे व याला धरून नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा दुपयोग केला आरोप मुर्खासारखा कारण भारतामध्ये सर्वात जास्त इथनॉल उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात उत्तर प्रदेशात कर्नाटकात तसेच संपूर्ण बिहार व बंगालच्या गंगा पट्यात होते पश्चिम विदर्भात इथनॉल उत्पादन फक्त ५ टक्के हि होत नाही व नितीन गडकरी हे मागील ११ वर्षांपासून परिवहन मंत्री आहेत व त्यांनी या विषयी कोणत्याही क्षणी पेट्रोलियम ,जड उधोग तसेच पर्यावरण मंत्रालयात ढवळाढवळ केली असल्यास या आरोप कर्त्यांनी दाखवावे . कृषी मध्ये निघणारा काडी कचरा तसेच ऊस गाळणी केल्यानंतर बाहेर पडणारा कचरा यापासुन ऊर्जा निर्माण करण्याची भूमिका नितीन गडकरी १९८५ पासून मांडत आहे यामुळे त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप हा बिनबुडाचा व वेदनादायी असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी मांडले

राजकीय पदाच्या स्पर्धा समोर ठेवून नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला बदनाम  चुकीचे 

ज्या मुंबई दिल्ली येथील सुपारी बाज पत्रकारांनी निखिल गडकरी व सारंग गडकरी यांचा उद्द्यमी स्वभाव व सत्तेच्या घाणेरड्या राजकारणापासुन अलिप्तता पहिली नाही त्यांनी त्यांचे मत न घेता भाजपामधील एका गटाच्या सुपारी वर गंभीर आरोप करणे हे आपल्या घटनादत्त अधिकाराची पायमल्ली आहेत . जर फक्त पंतप्रधान पदाचा स्पर्धा  व  नितीन गडकरी पात्रता यामुळे ही बदनाम होत असेल तर या महाराष्ट्राच्या रत्नांच्या बाजुने उभे राहणे व विदर्भाच्या भूमीपुत्राचा बचाव करावा ही विनंती किशोर तिवारी यांनी यावेळी केली आहे . 

=================================================



Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी