"पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ वर्षपुर्ती मुळे निवृत्ती नंतर २०१४ मध्ये संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना प्रधानमंत्री पदाची संधी द्यावी !"-किशोर तिवारी यांचे रा.स्व.संघा चे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना खुले पत्र !


प्रेस नोट : कृपेने प्रकाशनार्थ 


"पंतप्रधान नरेंद्र मोदी  ७५ वर्षपुर्ती मुळे निवृत्ती नंतर २०१४ मध्ये संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना प्रधानमंत्री पदाची संधी द्यावी !"-किशोर तिवारी यांचे रा.स्व.संघा चे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना खुले पत्र !

नागपूर, दि. १८ ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ७५ वर्षपुर्ती मुळे निवृत्ती नंतर २०१४ मध्ये संधी हिरावलेल्या नितीन गडकरींना  प्रधानमंत्री पदाची संधी द्यावी, असे खुले पत्र राज्य सरकारच्या शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचे पूर्व अध्यक्ष, २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी वाररूम' चे क्रियाशील सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक जुने 'संघटन शिबिर' प्रशिक्षित स्वयंसेवक किशोर तिवारी यांनी सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांना लिहिले आहे. या विषयात रा.स्व.संघाने उचित हस्तक्षेप करून गेल्या ११ वर्षापासून देशात सुरू असलेले व्यक्ती केंद्रित भांडवलदार धार्जिणे नेतृत्व आता बदलून "सब का साथ~ सब का विकास" हा नारा खऱ्या अर्थाने पूर्णत्वास न्यावा व स्व.दीनदयाल उपाध्याय यांचे 'अंत्योदय मिशन' खऱ्या अर्थाने साकार व्हावे, या साठी तिवारी यांनी, "अभी नहीं तो कभी नहीं" हे घोषवाक्य समोर करून, हा पत्र प्रपंच केला आहे. 

किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात पुढे लिहिले आहे की देशाने मोदी यांना ११ वर्षे काम करण्याची मोठी संधी आहे, त्यांनी प्रभु रामचंद्राचे भव्य मंदिरासह अनेक चांगली कामे सुद्धा केली आहेत. आता २०१४ मध्ये नितीन गडकरी यांची एका कटाद्वारे ज्यांची पंतप्रधान पदाची संधी हिरावण्यात आली होती व हे सर्व गोष्टी नितीन गडकरीना मी १४ डिसेंबर २०१२ ला  सांगितल्या होत्या मात्र पक्ष शिस्त व अभुतपुर्व संयम यामुळे ते त्यावेळी चूप राहिले होते आज जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व प्रकाश जावडेकर जिवंत आहेत ते सत्य जगाला सांगतील मी नितीन गडकरी यांची माफी मागतील ,

कार्यसम्राट व सर्वांना घेऊन चालणारे मंत्री म्हणून ख्याती व सर्वदूर मान्यता प्राप्त केलेले श्री. नितीनजी गडकरी यांना २०२९ चे लोकसभा निवडणुका पूर्वीचे उरलेले ४ वर्ष देशाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी व देशाला त्यांचे नेतृत्वात पुढे नेण्यासाठी एक सकारात्मक बदल घडवून आणावा, अशी विनंती तिवारी यांनी केली आहे. या मागणीची पूर्वपीठिका अशी की तिवारी यांनी सन २०१९ मध्ये सुद्धा नितीन गडकरी यांना पंतप्रधान करावे, यासाठी आग्रही मागणी रेटून धरली होती, पण त्यावेळी मोदी-शहा लॉबी ने २९२ जागा मिळाल्याने तिवारी यांनाच पक्ष सोडण्यास भाग पाडले होते. त्या नंतर ते गेली सहा वर्ष उद्धव ठाकरे यांचे सोबत होते. 

विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी ई.डी., सी.बी.आय.,मोका चा दुरुपयोग, केंदीय निवडणूक आयोग, गुप्तचर संस्था, इतर संवैधानिक संस्था बळकावून घेतल्याचा दुदैवी निरोप देशात जात असताना, मोदी-शहा राजवट हुकुमशाहीने वागत आहे, अशी सर्व जगात झालेली धारणा पुसून काढणे खूप आवश्यक असल्यामुळे नेतृत्व बदल आवश्यक झाला आहे, याकडे ही तिवारी यांनी प्रकर्षाने लक्ष वेधले आहे.

किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात आणखीन पुढे म्हटले आहे की वास्तविक सन २००८ ते २०१२ मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून श्री.नितीन गडकरी यांनी केलेले कठोर परिश्रम हेच २०१४ चे निवडणुकीत केंद्र सरकार बदलासाठी एक मुहूतमेढ ठरली होती. पंतप्रधान पदी त्यांनाच संधी मिळेल, अशी सर्वत्र धारणा असताना,त्यांना पूर्ती उद्योगाचे कथित कांड पुढे करून, त्यांना २०१२ साली षडयंत्र पूर्वक अध्यक्ष पदावर पुन्हा निवड होवू नये, म्हणून त्यांना कलूशीत कारवाया करून षडयंत्र पूर्वक त्यांचे पाय ओढण्यात आले होते. त्यानंतर गुजरात लॉबी च्या दावणीला बांधलेल्या लोकांनी पक्ष व प्रधानमंत्री पद बळकावून त्याचे गडकरी विरोधी अभियान पूर्ण केले. आता मात्र गेल्या ११ वर्षाचे मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामाच्या तुलनेत,या सरकारला चांगले बदनाम करता येईल, असा आयता मसाला मोदी~शहा यांच्या एकंदरीत कार्य प्रणालीने दिला असून, यामुळे देशात आता नेतृत्व बदल आवश्यक असून संघाचे मुशीत तयार झालेले व ज्यांचे कार्यकुशलतेने सर्वमान्य असे "महाराष्ट्र पुत्र" नितीनजी गडकरी  यांना संधी देण्यासाठी संघाने उघड प्रयत्न करावेत व वयाची ७५ वर्षे देशाची सेवा करणाऱ्या मोदी यांना आता मार्गदर्शक मंडळात पाठवावे, यासाठी संघाने आपला 'व्हॅटो' वापरण्याची वेळ आली आहे, असे ही तिवारी यांनी विषद केले आहे.

सध्या देशात प्रचंड कृषी संकट, मोडकळीस आलेली ग्रामीण अर्थ व्यवस्था,स्वास्थ व शिक्षणाचा बाजार,भारत सरकारच्या प्रमुख सार्वजनिक उद्योग यांचे खाजगीकरण, विदेश नीती, आपले सर्व शेजारी देशांशी संबंध, अमेरिकेकडुन आपल्यावर टेरीफचे प्रचंड आर्थिक संकट, विरोधकांनी सुरु केलेला कटु प्रचार, मोदी यांच्या कार्यपद्धतीवर भाजपा व संघ परिवारामध्ये सुरु असलेला अंतर्गत असंतोष,भाजपाचे ११ वर्षात झालेले निर्लज्य कॉंग्रेसीकरण, सर्व क्षेत्रात सुरु असलेला अनियंत्रित बेलगाम भ्रष्टचार , ह्या समस्यावर रामबाण उपाय म्हणून, संघाच्या अत्यंत जवळ असलेले व संघ परिवाराशी सुमधुर संवाद असणारे नितीन गडकरी एकमेव पर्याय आहेत. नितीन गडकरी यांच्यावर झालेला आजवरचा अन्याय व सतत होणारा अपमान सहन करून त्यांनी त्यावेळी दाखवलेला विनय व संयम, हे एक संतांचे लक्षण आहे व त्याचे अविरत निष्ठेने निस्वार्थ सेवाभावे  संकल्प करून काम करण्याची अफलातुन ईश्वरीय पध्दत  व अजात शत्रु स्वभाव तसेच सरकारमध्ये अधिकाऱ्यांना शिस्त लावून धडाडीने काम सिद्धीला नेण्याचा दीर्घ  अनुभव, यामुळे आता खरे कर्तृत्व दाखविण्याऱ्या या नागपूरच्या भूमिपुत्राला  देश नेतृत्वाची एक संधी मिळाली , यासाठी  देशव्यापी अभियान चालविण्याची गरज असल्याचे तिवारी यांनी नमूद केले आहे.

.......

कृपया प्रसिद्धी व प्रकाशनार्थ सादर ....


किशोर तिवारी

मोबाईल न. 9422108846

ईमेल आयडी : kishortiwari@gmail.com

🙏🏻💑🙏🏻


Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी