ग्रॅंड मराठा फाउंडेशन संस्थापक रोहित शेलटकर यांची लंडनवरून ११ जूनला विदर्भ भेट : मागील २० वर्षात केलेल्या अभूतपूर्व सामाजिक कामाचा आढावा घेणार व नवीन प्रकल्प सुरू करणार

ग्रॅंड मराठा फाउंडेशन संस्थापक रोहित शेलटकर यांची लंडनवरून ११ जूनला विदर्भ भेट : मागील २० वर्षात केलेल्या अभूतपूर्व सामाजिक कामाचा आढावा घेणार व नवीन प्रकल्प सुरू करणार 

दिनांक -११ जून २०२५

रोहित शेलटकर हे मूळचे महाराष्ट्रातील कोकणवासी असून सध्या ते युनायटेड किंगडम (UK) मध्ये एक यशस्वी उद्योजक व जागतिक पातळीवरील विचारवंत ज्यांनी मागील २० वर्षात विदर्भाच्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना सतत साथ दिली बियाणे ,शेतकरी विधवांना मुलीच्या लग्नासाठी ,पाल्यांच्या शिक्षणासाठी,बिनव्याजी पीककर्ज ,शेतात बंधारे ,विहिरी व त्याला वीज पंप ,आदिवास्यांना खावटी ,करोना महामारीत पांढरकवडा परिसरात सतत ६ महिने किट वाटप ,महामार्गावरून जाणाऱ्या लाखो प्रवास्यांची खाण्याची व गावापर्यंत पोहचविण्याची संपूर्ण मदत सात समुद्रापलीकडे करणाऱ्या या थोर समाजसेवकाचे ११ जूनला पांढरकवडा येथे येत आहे व नवीन अभ्यासिका ,संगणक कौशल विकास केंद्राचे ,मारेगाव व वसंत नगर जल शुद्धीकरण यंत्राचे तसेच नाला खोली कारण ,चेक डॅम या सर्व कामाचा लोकार्पण रोहित शेलटकर करणार आहेत 

ग्रॅंड मराठा फाउंडेशन – ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्पित एक सामाजिक चळवळ 

ग्रॅंड मराठा फाउंडेशनची स्थापना २०१३ साली झाली, ही केवळ एका संस्थेची सुरुवात नव्हती तर ग्रामीण महाराष्ट्रातील बदलाची पहिली पायरी होती. या संस्थेचे संस्थापक श्री. रोहित शेलटकर हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या ते युनायटेड किंगडम (UK) मध्ये एक यशस्वी उद्योजक व जागतिक पातळीवरील विचारवंत म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांचे मन व सेवा वृत्ती अजूनही आपल्या मातृभूमीशी आणि ग्रामीण भागातील जनतेशी अतूटपणे जोडलेले आहे.

त्यांनी आपल्या कामातुन वेळ काढून, आपल्या गावकऱ्यांसाठी काहीतरी मोठं आणि कायमस्वरूपी करायचं ठरवलं आणि त्यातूनच ग्रॅंड मराठा फाउंडेशनचा जन्म झाला. संस्थेची स्थापना करताना त्यांनी विशेषतः मराठवाडा व विदर्भातील कृषी संकट, शेतकरी आत्महत्या, आणि ग्रामीण भागातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या दृष्टीने, खरा विकास हा केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही समान संधी, सुविधा आणि शिक्षण उपलब्ध करून दिल्याशिवाय होऊ शकत नाही.

श्री. शेलटकर यांचा विश्वास आहे की, "समाजाचे खरे परिवर्तन हे केवळ आर्थिक मदतीने नव्हे तर शिक्षण, स्वच्छता, महिलांचे सबलीकरण, आणि पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनातूनच शक्य आहे." याच विचारांना मूर्त स्वरूप देण्यासाठी ग्रॅंड मराठा फाउंडेशनने मागील दशकभरात विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले असून, त्यांचा प्रभाव शेकडो गावांपर्यंत आणि हजारो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे.फाउंडेशनचा पाया ठेवताना एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर होतं : "शेतकऱ्यांना त्मनिर्भर बनवणं आणि त्यांचं आयुष्य सुसह्य करणं."

आज, ग्रॅंड मराठा फाउंडेशन केवळ एक स्वयंसेवी संस्था राहिलेली नसून, ती एक प्रेरणादायी चळवळ बनली आहे जी ग्रामीण विकासाचे नवे मार्ग उघडत आहे.

1.शुद्ध पेयजल प्रकल्प: नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ११ गावांमध्ये वॉटर आर.ओ. आणिएटीएम यंत्रणा कार्यान्वित करून १२,००० हून अधिक नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात आले.
2.डिजिटल शिक्षण कार्यक्रम: ग्रामीण भागातील शासकीय शाळांना संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
3.महिला सबलीकरण उपक्रम: शिलाई मशीनचे वाटप, आर्थिक संकटात मदत, तसेच महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले.
4.जलसंधारण कार्यक्रम: दिलासा संस्थेसोबत केलेल्या सहकार्याने केळापूर तालुक्यातील ३ गावांमध्ये डोहा, रिचार्ज पिट व गॅबियन संरचना उभारून पाण्याचे जतन करण्यात आले.
5.कस्टम हायरिंग सेंटर: महिलांच्या स्वयंसहायता गटांना कृषी उपकरणे पुरवून त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या.
6.ऍडव्हान्स डिजिटल लिटरसी प्रोग्राम : जनहित बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या सहकार्याने टॅली, वेबसाईट डिझाईन व कोडिंगसारख्या प्रशिक्षण वर्गांतून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज केले.
7.पूरग्रस्तांना मदत: उमरखेड व पुसद तालुक्यातील ७०० हून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरीत करण्यात आले.
8.स्टेशनरी वाटप उपक्रम: दरवर्षी ३ ते ४ हजार विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप केले जाते
९.विद्यार्थ्यांसाठी भोजनालय: मारेगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज भोजनालयाची व्यवस्था.
 
अर्थातच, आज ग्रॅंड मराठा फाउंडेशन केवळ एक स्वयंसेवी संस्था न राहता, ग्रामीण विकासासाठी झटणारी एक व्यापक सामाजिक चळवळ बनली आहे. ही चळवळ केवळ समस्या ओळखून त्यावर उपाय शोधण्यापुरती मर्यादित नाही, तर ती गावकऱ्यांच्या जीवनात स्थायिक आणि सकारात्मक बदल घडविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.
दरवर्षी १०,००० हून अधिक गरजू नागरिक, विद्यार्थी, महिला व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ग्रॅंड मराठा फाउंडेशन त्यांचं आयुष्य अधिक सक्षम, सशक्त आणि सुरक्षित बनवत आहे. हे उपक्रम केवळ मदतीपुरते न राहता, लाभार्थ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारे ठरले आहेत. शिक्षण, आरोग्य, पाणी, महिला सक्षमीकरण, डिजिटल साक्षरता आणि कृषी क्षेत्रातील समर्थन या विविध आघाड्यांवर कार्य करताना, फाउंडेशनने आपल्या कामातून एक विश्वास निर्माण केला आहे , की कोणत्याही बदलाची सुरुवात ही आपल्या गावापासून होते.
आजही श्री. रोहित शेलटकर यांचा ग्रामीण महाराष्ट्रासाठी असलेला आत्मीय भाव आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव हेच ग्रॅंड मराठा फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमामागचे प्रेरणास्त्रोत आहेत. फाउंडेशनची ही वाटचाल आता एका सामाजिक आंदोलनामध्ये रूपांतरित होत असून, येणाऱ्या काळातही फाउंडेशन अधिक व्यापक पातळीवर ग्रामीण विकासाची गाथा घडविणार आहे.
ग्रॅंड मराठा फाउंडेशन म्हणजे एक *संकल्प, सेवा आणि समर्पणाची प्रेरणादायी कहाणी* , जी प्रत्येक ग्रामीण माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी अविरत झगडत आहे.

=========================================================

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी