केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात स्थानीय भूमिपुत्रासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही - अंकित नैताम यांना संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी मातोश्री गाठली
केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघात स्थानीय भूमिपुत्रासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आग्रही - अंकित नैताम यांना संधी मिळावी यासाठी किशोर तिवारी यांनी मातोश्री गाठली
दिनांक -२२ ऑक्टोबर २०२४
केळापूर -आर्णी या मतदार संघात दिग्रस यवतमाळ वर्धा उमरखेड येथील पार्सल मागील ३० वर्षापासून राजकीय पक्ष लादत असून बापाचं संपल तर मुलगा हा परीवार वादाला जनता कंटाळली असुन ,जनतेला एकीकडे मिशावाल्याची भीती असुन पहिले भाजप नंतर बंडखोरी पुढे राष्ट्रवादी ,तेलंगाणाची टी आर एस ,लोकसभेत काँग्रेसचे पॅकेज पुन्हा भाजपची आत बाहेर होण्याच्या बातम्या यामुळे आपल्या दररोज नजरेसमोर राहुन हाकेवर काम करणारा गरीब कार्यकर्ता अंकित नैताम यालाच आमदार करण्याचा संकल्प स्थानीय मतदारांनी केल्यामुळे व तास दबाव जनतेनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांच्यावर वाढविल्यामुळे त्यांनी मुंबई गाठली असुन उद्धव ठाकरेंना केळापूर मतदार संघातील मतदारानाचा निरोप सांगितला असुन महाविकास आघाडी ने अंकित नैताम याना संधी यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीशी सुद्धा चर्चा करणार आहेत .
किशोर तिवारी यांनी केळापूर आर्णी विधानसभा मतदार संघावर शिवसेना ( उबाठा) जाहीर होणार आहे. या जागेवर अंकित नैताम यांची उमेदवारी जाहीर झाल्यास राजकीय समिकरणे बिघडणार आहे. उबाठाचे राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी केळापूर -आर्णी विधानसभा मतदार संघांची जागा शिवसेना या पक्षाला महाविकास आघाडीने सोडावी व पांढरकवडा येथील स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी, यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईला मातोश्री येथे ठान मांडून बसले आहे.
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा झाली आहे. आपल्या हक्काच्या जमिनीशी नाळ जुडलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्याला यावेळी संधी देण्याचा तसेच मतदार संघामध्ये जितेंद्र मोघे यांना मतदारांनी नापसंती दाखवीत आहे परीवारवादाला सोडुन आमदार निवडण्याच्या आग्रहाचा आदर करावा अशी विनंती शिवसेनेचे ( उबाठा ) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.
========================================

Comments
Post a Comment