विधान सभा निवडणूकर २०२४- विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये सतत गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा -शिवसेना(उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी
विधान सभा निवडणूकर २०२४- विदर्भातील २०१४ व २०१९ मध्ये सतत गमावलेल्या जागांचा आग्रह काँग्रेसने सोडावा -शिवसेना(उबाठा) प्रवक्ते किशोर तिवारी
दिनांक -१८ ऑक्टोबर २०२४
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस ने आपल्या इंडिया आघाडीमधील घटक पक्षांना त्यांचा सहभाग करून जागा वाटप केल्या नाहीत तसेच तिकीट वाटपात गटबाजी ,चाटुकार चमचे दलाल तसेच परिवार वाद नेत्यांनी जपल्यामुळे राजसत्ता आपल्या अहंकाराने गमावली आहे हा अनुभव ताजा असतांना सध्या महाराष्ट्रात आपल्या मुलाला ,मुलीला ,चमच्यांना ,दलालांना तिकट देण्याचे तसेच गटबाजी व तिकीट विक्री संपर्क प्रमुख राजरोसपणे करीत असल्याचा अनेक तक्रारी समोर येत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यात जनता भाजपला घरी बसविण्याचा संकल्प करून बसली असतांना ज्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे अशा सर्व ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या तरुण युवा सक्रीय गरीब कार्यकर्त्यांसाठी सोडावी असा आग्रह शिवसेना (उबाठा ) गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे .
यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ ,केळापुर,वणी व दिग्रस जागेसाठी शिवसेना (उबाठा) आग्रही
यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ ,केळापुर,वणी व दिग्रस ,राळेगाव या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार सतत पडत आहेत तेच तेच उमेदवार वा त्यांचे कुटुंबीय यांची नावे समोर आल्यामुळे मतदार काँग्रेसच्या नेत्यांच्या चुकीमुळे हरियाणा सारखी वाढलेली सत्तेची ताट नाकर्त्या भाजपला चोरण्याची आयती संधी तर मिळणार नाहीना अशी भीती व्यक्त करीत आहेत त्यातच किशोर तिवारी यांनी आदिवासी चळवळीचे आंदोलक अंकित नैताम रेटले असून मात्र या ठिकाणी पुत्र प्रेम व धृतराष्ट्र वायरस त्रास देत असल्याची तक्रार किशोर तिवारी यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मतदार तेच तेच आमदार आलूटून पालटून देण्याच्या मनस्थितीत नाही त्यांना नवीन चेहऱ्याला संधी द्यावयाची आहे यासाठीच शिवसेना उबाठा ने यवतमाळ येथून संतोष ढवळे ,केळापूर आर्णी वरून अंकित नैताम ,दिग्रस वरून सुनील महाराज तर वणी वरून संजय देरकर यान हाच आग्रह धरला आहे मात्र काँग्रेस हरियाना पॅटर्न जबरीने राबवत असुन आता काँग्रेस अध्यक्ष खर्गे व राहुल गांधी यांनी मध्यस्थी करून मित्र पक्षांना योग्य तो सन्मान द्यावा .
शिवसेना उबाठा एकही उमेदवारी मागणारा बंडखोरी करणार नाही
शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला मोदी शाह अडाणी यांच्या आक्रमणापासून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ करणे काळाची असल्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील सर्व प्रमाणिक शिवसैनिक एकजूट राहुन पूर्णवेळ तनमनधन लाऊन निवडणूकीच्या रणांगणात उतरतील व एकही शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणार नाही हे किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले .
================================================================

Comments
Post a Comment