मुख्यमंत्र्यानी २ कोटी लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची सर्व गोपनीय माहीती सार्वजनिक केली - सर्व बहिणींना १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या -किशोर तिवारी -प्रवक्ते- शिवसेना ठाकरे गट

मुख्यमंत्र्यानी २ कोटी लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची सर्व गोपनीय माहीती सार्वजनिक केली - सर्व बहिणींना १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या -किशोर तिवारी -प्रवक्ते- शिवसेना ठाकरे गट  

दिनांक ११ ऑगस्ट २०२४

मागणी  : "मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची नावे, पूर्ण पत्ते, मोबाईल न, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, माहेर चे नाव, पत्ता आदी सर्व व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती सत्ताधारी राजकीय लोकांना लीक करून राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केलेला असून या योजनेत अर्ज करणाऱ्या भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक स्वरूपाची गोपनीय माहिती सरकारने लीक केल्याने कायदेशीर एक लाख रुपये नुकसान भरपाई प्रत्येक महिलेस देण्यात यावी !"- किशोर तिवारी -प्रवक्ते- शिवसेना ठाकरे गट  


 संकेत स्थळावर जा व दोन कोटी महिलांची अतिशय गोपीनिय माहीती फुकटात घ्या 


महाराष्ट्रात येत्या दोन/ तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राज्यांतील एकनाथ शिंदे सरकारने लोकांना लुभाविनाऱ्या कथित कल्याणकारी योजनांच्या नावाखाली आता अनेक अर्ज मागविणे सुरू केलेले आहे पण या एकाही योजनेचा लाभ सामान्य जनतेला मिळणे सोडून आता असे लक्षात आले आहे की अर्जातील महिलांनी सादर केलेली अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती आपल्या राजकीय स्वार्थासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वातील भाजपा प्रणित महायुती सरकारने जाहीर रित्या प्रगट करून गोपनीयतेचा भंग केला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची नावे, पूर्ण पत्ते, मोबाईल न, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, माहेर चे नाव, पत्ता आदी सर्व व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती आज सत्ताधारी राजकीय लोकांच्या अक्षम्य चुकीच्या कृतीमुळे राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केलेला असून या योजनेत अर्ज करणाऱ्या भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक स्वरूपाची गोपनीय माहिती सरकारने लीक केल्याने प्रत्येक महिलेस कायद्याने रू.१ लाख रुपये नुकसान भरपाई देणे क्रम प्राप्त आहे. शिंदे सरकारने अश्याप्रकरे अर्जातील व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय अशी माहिती त्यांचे चेले चपाटे राजकीय लोकांना त्यांचे राजकीय फायद्यासाठी वाटणे ही एक गंभीर गैरकायदेशिर बाब आहे. हा सर्व प्रकार कुणी केला ? कुणाचे आदेश व  राजकीय वरद हस्ताने घडला, याची सखोल चौकशी होऊन तातडीने कारवाई करण्यात यावी व या गंभीर प्रकाराने ज्या महिलांची व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती सरकारचे लापरवाई ने लिक झाली आहे, त्यासाठी कायदेशीर एक लाख रुपये नुकसान भरपाई प्रत्येक महिलेस देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते किशोर तिवारी यांनी सरकारला दिलेल्या कायदेशीर नोटीस मध्ये केली आहे.

किशोर तिवारी यांनी धुळे महा नगर पालिकेच्या एकावॉर्डातील यादी कशी लीक झाली , त्याचा नमुना प्रसार माध्यमांना अशी एक सांकेतिक यादी जोडून केला असून या यादीचे अवलोकन केले असता मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची नावे, पूर्ण पत्ते, मोबाईल न, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, माहेर चे नाव, पत्ता आदी सर्व व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती आज सत्ताधारी राजकीय लोकांना लीक करून राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केलेला असून या योजनेत अर्ज करणाऱ्या भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक स्वरूपाची गोपनीय माहिती सरकारने लीक केल्याने प्रत्येक महिलेस कायद्याने रू.१ लाख रुपये नुकसान भरपाई देणे क्रम प्राप्त आहे. सरकारला अर्जातील व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय अशी माहिती त्यांचे चेले चपाटे राजकीय लोकांना त्यांचे  मुख्यमंत्र्यांना राजकीय फायद्यासाठी वाटणे ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्या खालील केंद्र व राज्य सरकारने वेळोवेळी आदेशित केलेल्या नियमावलीचे मुख्यमंत्र्यांना व 
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना साधे भान राहू नये , ही एक अत्यंत खेदाची बाब आहे. यासाठी या संपूर्ण प्रकाराची चौकशी व तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे आणि या सर्व योजनेत अर्ज केलेल्या प्रत्येक महिलांना १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी कायदेशीर मागणी करणारी नोटीस किशोर तिवारी यांनी मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांचे नाव बजाविली असल्याने या प्रकरणात एकच खळबळ माजली आहे. 

*****

कृपेने प्रकाशनार्थ :

आपला नम्र,

किशोर तिवारी,
प्रवक्ते - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मो. ९४२२१०८८४६

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी