आर्थिक संकल्प २०२४-शिवसेना (उबाठा ) प्रतिक्रिया : केंद्राने महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा केली-किशोर तिवारीं

आर्थिक संकल्प २०२४-शिवसेना (उबाठा ) प्रतिक्रिया : केंद्राने  महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा केली-किशोर तिवारीं 

दिनांक -२३ जुलै २०२४ 

एकीकडे महाराष्ट्राचे दिवाळखोर भ्रष्ट मिंधे सरकार आपल्या अर्थ संकल्पात सुमारे दीड लाख कोटीच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना घोषित करतात त्यावेळी मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून करतात महाराष्ट्रातील कर्ज बाजारी आत्महत्याग्रस्त कापूस सोयाबीन ८० लाख शेतकऱ्यांच्या कर्ज माफी ,कापसाच्या व सोयाबीनच्या नापिकीचा प्रश्न ,हमीभावाचा मुद्दा ,सिंचनाचा बॅकलॉग ,महागड्या वीज निर्मितीचा अडाणी प्रकोप यासाठी एकही दमडी न दिल्यामुळे भाजपचा पराजय येत्या विधान सभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी निश्चित केल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे 

महाराष्ट्रात दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी, अपूर्ण प्रकल्प, मुंबई ,पुणे ,नागपुर  सह विदर्भ,मराठवाडा उत्तर महाराष्ट्र साठी विशेष निधी जाहीर झाला नाही यावर एक पैसाही दिला गेला नाही आंध्र बिहार सारखे विषेय पॅकेज निवडणीपूर्वी देणे गरजेचे असतांना केलेली उपेक्षा भोवणार . संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कृषी संकट, आदिवासी विकासावरील अपूर्ण प्रकल्प, पंत प्रधान आवास योजनेतील ७० टक्के अर्धवट राहिलेली घरे,८० टक्के अपूर्ण पिण्याच्या पाण्याच्या योजना, आरोग्य ,शिक्षण, वन, केंद्राच्या योजनेतून होणारी पैशांची लूट आदींचा उल्लेख केला नाही.पीडब्ल्यूडी,ग्रामविकास बंद पडलेल्या योजनतेबाबत जनतेचा प्रचंड असंतोष कमी करण्यासाठी केंद्र सरकार या अर्थसंकल्पात प्रयत्न करणार असल्याची अपेक्षा होती मात्र महाराष्ट्र सरकारने फक्त मोठे कंत्राट यासाठीच निधीचा पाठपुरावा केला त्यामुळे शेतकरी ,दलित आदीवासी ,गरीब यांच्या मूळ समस्यांना  केंद्र सरकारने केराची टोपलीत टाकली आहे असा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला. 

शेतकऱ्यांच्या कीटकनाशक तणनाशक महागडी करणारा अर्थ संकल्प 

केंद्र सरकारने  सर्व प्रकारची खते, कीटकनाशके आणि कृषी निविष्ठांवर जीएसटीमुक्त करून महाराष्ट्र कृषी संकट निवारण निधीची घोषणा केली असती, तर कदाचित भाजपच्या राज्य सरकारवर  असलेली नाराजी कमी झाली असती , परंतु मोदीजींनी केंद्रीय अर्थसंकल्पात याच वस्तू महागड्या केल्या असुन महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे यामुळे जनता महायुतीला येत्या विधान सभेच्या निवडणुकीत निश्चित पणे नाकारणार हे निश्चित झाले आहे . 

========================

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी