४८ तासात विदर्भात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विदर्भात यावर्षी दररोज चार आत्महत्या -किशोर तिवारी

 ४८ तासात विदर्भात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या : विदर्भात यावर्षी दररोज चार आत्महत्या -किशोर तिवारी 

दिनांक -३० जुन २०२४ 

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु असतांना आता पूर्व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या असुन मागील ४८ तासात पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची राजधानी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात २ शेतकऱ्यांनी तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हयातील २ तर भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची वृत्त आहे मागील वर्षी झालेली नापीकी व सरकारी मदत न मिळाल्यामुळे तसेच यावर्षी बँकांनी पीककर्ज वाटप रोखल्याने या आत्महत्या होत असुन सरकारने या आंत्महत्या रोखण्यासाठी तात्काळ पाऊले उचलावी अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी प्रसार माध्यमांना दिली . किशोर तिवारी यांनी २०१५ ते २०२१ पर्यंत कै वसंतराव शेती स्वावलंबन मिशनवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम सुद्धा सादर केला होता मात्र केंद्र सरकारने त्याला केराची टोपली दाखविल्यामुळे आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. 

मागील ४८ तासात विनोद ढोरे रा. दाभेविरली जिल्हा भंडारा ,भोजराज राऊत रा. चोरटी व नीलकंठ प्रधान रा. रणमोचन दोन्ही चंद्रपूर जिल्हा ,बन्सी पवार रा. गांधीनगर व दादाराव बोबडे रा. गगनमाळ दोन्ही जिल्हा यवतमाळ  यांनी आत्महत्या केल्या असुन यावर्षी जून पर्यंत विदर्भात पश्चिम विदर्भात ६९४ तर पूर्व विदर्भ २२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन ह्या सर्व आत्महत्या चुकीच्या धोरणामुळे  होत असलेला नरसंहार असुन केंद्र सरकारने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी यावेळी केली आहे . 

विदर्भात फक्त ४५ टक्के पिक कर्ज वाटप 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार पीककर्ज माफी चे संकेत  दिले होते व विदर्भात प्रचंड नापिकी झाल्यामुळे कापसाला व सोयाबीन ला भाव न मिळाला नाही त्यातच दुष्काळ घोषित केला नाही ,पीक विमा मिळाला नाही व ३०जून पर्यंत पिक कर्ज वाटप फक्त ५०टक्के झाले असुन यामुळे पश्चिम विदर्भ पाठोपाठ आता पूर्व विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे लोण पोहचले आहे असा अआरोप किशोर तिवारी यांनी केला 

अमरावतीमध्ये यावर्षी दररोज १ शेतकऱ्याने जीवन संपवले

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची देशात  यवतमाळ जिल्हा  राजधानी म्हणून ओळखला जात असला तरी शेजारील मागील तीन वर्षात सरकारी आकडेवारी नुसार अमरावती जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नवीन राजधानी होत  आहे . यवतमाळच्या सीमेला लागून असलेला अमरावती जिल्ह्यात लागवडी खाली  कापूस आणि सोयाबीनचा पट्टा देखील आहे आणि जिल्ह्याच्या काही भागात प्रसिद्ध नागपूर संत्र्याची लागवड केली जाते. यावर्षी मे महिन्यापर्यंत अमरावतीत १४३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. पाच महिन्यांत १५४ दिवस असताना, व्यावहारिकरित्या दररोज एका शेतकऱ्याने अमरावती जिल्ह्यात आत्महत्या केली,, अशी आकडेवारी राज्य सरकारने दिली आहे तर  सरकारी आकडेवाडीत  मे २०२४ पर्यंत १३२ आत्महत्यांसह यवतमाळ दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु फारसे मागे नाही. जूनचे आकडे अद्याप संकलित करायचे आहेत.


२०२१ पासून अमरावतीने आत्महत्यांमध्ये यवतमाळला मागे टाकले आहे,जेव्हा २०१२ मध्ये ३७० शेतकरी आत्महत्या झाल्या, त्यानंतर२०२२ मध्ये ३४९ आणि २०२३ मध्ये ३२३. यवतमाळमध्ये २०२१ ते २०२३ पर्यंत अनुक्रमे २९०, २९१ आणि ३०२ शेतकरी आत्महत्या झाल्या असा सरकारी आकडा आहे  शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी म्हणाले की, अमरावतीमध्ये परिस्थिती विशेषतः गंभीर आहे. शेतकरी सोयाबीनकडे वळले, आणि उत्पादनात लक्षणीय घट झाली. गतवर्षी दरही ४००० रुपये  प्रति क्विंटलपर्यंत घसरले होते. पुरेसे बँकिंग क्रेडिट नसल्यामुळे, बरेच लोक छोट्या वित्त कंपन्या किंवा सावकारांवर अवलंबून असतात आणि त्यांना कठोर वसुलीला सामोरे जावे लागते व आत्महत्या करतात २००१  पासून राज्य सरकार पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सांभाळत आहे; अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा आणि वर्धा. जिल्ह्यात दोन दशकांत २२ हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या आहेत. आता या गंभीर विषयावर सर्व राजकीय पक्षांनी तोडगा काढावा अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी यांनी यावेळी केली 

================================================================

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी