पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी

पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी 

दिनांक -३१ जानेवारी २०२५


यावर्षी २०२५ मध्ये पश्चिम विदर्भात २००१ पासुन पहिल्यांदाच विक्रमी २००९ नापिकी ग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन ही जागतिक स्तरावर शेतकऱ्यांच्या नरसंहाराची सर्वात मोठी घटना आहे  भाजप सरकार,प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वच राजकीय पक्ष मौन असुन संपुर्ण २०२५ वर्ष केवळ लोकसभा, विधानसभा,स्थानीय स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीच्या  धामधुमीत गेला असुन सर्वच राजकीय पक्षांनी  आश्वासनाचा पाऊस पाडला मात्र शेतकरी आत्मह्त्या हा गंभीर विषय हवेत विरला अशी खंत शेतकरी  आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य  करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली . 

२०२५ मधील विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे 
पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात  जुन्या बेरार वा वऱ्हाड चे यवतमाळ ,अमरावती ,अकोला ,वाशीम ,बुलढाणा येतात व प्रशासकीय रित्या पूर्व विदर्भाचा वर्धा जिल्हा येतो.बहितेक सर्व क्षेत्रात कोरडवाहू शेती करण्यात  येते.पश्चिम विदर्भात ४५ टक्के क्षेत्रात  कापुस घेण्यात येतो तर ४० टक्के क्षेत्रात सोयाबीन व उरलेल्या क्षेत्रात विविध डाळ ,ज्वारी   घेण्यात येते यावर्षी ३ जून पासुन १२ नोव्हेंबर पर्यंत सतत पावसाने कहर केला सरकारने दोन वेळा नुकसान भरपाई दिली मात्र त्यामुळे कृषी संकट कमी झाले नाही याला फक्त ५० टक्के बँका मार्फत पीककर्ज वाटप ,सावकारांच्या व  मायक्रो फायनान्स बचत गटा मार्फत लूट  ,लागवडीचा खर्च  दुप्पट झाल्यामुळे कर्जाचे अनियंत्रित  ओझे त्यातच संपुर्ण सोयाबीन नापीकी ,कापसाचे ४० टक्के आलेले पीक ,तुरीच्या पिकाची नापिकी हि प्रमुख कारणे असुन सरकारची मदत तटपुंजी असल्यामुळे कृषी संकटात भरच पडली आहे . 
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्या मध्ये आघाडीवर 
२०२५ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी ४४६ आत्महत्या झाल्या असुन त्या पाठोपाठ अमरावती ३९६ ,अकोला ३८८,बुलढाणा ३४३, वर्धा २२४ तर वाशीम जिल्ह्यात  २१२  शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असुन यामध्ये युवा शेतकरी ,भाड्याने शेती करणारे शेतकरी यांच्या नावाने सातबारा नाही म्हणुन सरकार दरबारी या आत्महत्यांची नोंद नाही . मक्त्याने म्हणजे भाड्याने शेती करणारे शेतमजुरांची संख्या प्रत्येक खेड्यात ५० टक्के असुन यांना सरकारी पीककर्ज तसेच सरकारची नुकसान भरपाई मिळत नाही वरून शेतीचे भाडे नापिकी झाली तरी देणे अटळ आहे यामुळे सातबारा नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर्षी प्रचंड वाढल्या आहेत कारण ते खाजगी सावकार ,मायक्रो फायनान्स कंपन्या .गावागावात सुरु झालेल्या राजकीय नेत्यांच्या नागरी पत संस्था आघाडी वर असुन ह्या गंभीर विषयावर बोलण्यास सरकार,प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वच राजकीय पक्ष बोलण्यास तयार नाहीत २०२५ मध्ये झालेल्या विक्रमी शेतकरी आत्महत्या असुन जर सरकारने पत पुरवडा ,बियाणे सुधार ,पीक पद्धतीत बदल  तसेच लागवड खर्च ५० टक्क्यांनी कमी करने ,हमीभावावर राज्याने बोनस घोषीत करणे  ह्या उपाय योजना केल्या नाहीतर २०२६ मध्ये कृषी संकट व शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढतील अशी भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे 
==================================================================

Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी