महाराष्ट्रात ७० लाख हेक्टर वरील उभी पीके पूर्णतः बरबाद : राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत अपुरी - केंद्र सरकारने कमीतकमी ५० हजार कोटीची मदत करावी -किशोर तिवारी

महाराष्ट्रात ७० लाख हेक्टर वरील उभी पीके पूर्णतः बरबाद : राज्य सरकारची  शेतकऱ्यांना मदत अपुरी - केंद्र सरकारने  कमीतकमी ५० हजार कोटीची मदत करावी -किशोर तिवारी 


दिनांक -२३ सप्टेंबर २०२५ 

महाराष्ट्रात १ जून पासून सुरु असलेला पाऊस यावर्षी दसरा दिवाळीत सुद्धा असाच अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे मात्र आज पर्यंत  विदर्भ, कोकण मराठवाड्यात,उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र,खान्देश पावसाच्या या रौद्ररुपाच्या ढगफुटीने सोयाबीन ,मक्का ,कापुस ,उडीत ,ऊस धान नष्ट झाले आहे हे नुकसान ३० जिल्ह्यमध्ये ७० लाख हेक्टर वर आता २६ सप्टेंबरपासून उरलेल्या ३५ लाख हेक्टर मधील उरलेली पिके सुद्धा नष्ट होणार आहे,महाराष्ट्रात अतिवृष्टीने संपुर्ण खरीप अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच आज राज्यसरकारने २ हजार २१५ कोटीची मदत  फक्त ३१ लाखावर शेतकऱ्यांना प्रत्येकी सरासरी ७ हजार रुपयाची तोटकी मदत जाहीर केली आहें  .एकीकडे आजपर्यंत शेतकऱ्यांचा ७० लाख हेक्टर वर लागवडी साठी खर्च कमीतकमी ५० हजार कोटी झाला असल्यामुळे मायबाप सरकारने कमीतकमी लागवडीचा खर्च तरी द्यावा यासाठी आता केंद्र सरकारला सांगडे घालण्यात येणार असल्याची माहीती शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी दिला आहे . 

यावर्षी महाराष्ट्रात खरीप हंगामात १ कोटी ६ लाख हेक्टर मध्ये मुख्यतः नगदी पिके कापूस सोयाबीन मक्का उडीत तूर ज्वारी ऊस कांदा हि नगदी पिके लावण्यात आली होती यासोबतच बागायती पिके सुद्धा पेरण्यात आली होती अनेक भागात जून मध्ये रट्ट्या पाऊस आल्याने दुबार तिबार पेरणी करावी लागली त्यानंतर संपुटन्ट जून जुलै ऑगस्ट व आता सप्टेंबर सतत मुसळधार पाऊसाने कहरच केला त्यात रोगराई वाढल्याने कीटक नाशक ,अभुतपुर्व गवत वाढल्याने तणनाशक याचा विक्रमी वापर शेतकऱ्यांनी केला .कशीतरी उरलेली पिकांची मशागत करू या आशेने शेतकऱ्यांनी काळाबाजारातून युरीया विकत घेऊन टाकला मात्र हा सारा विक्रमी खर्च वाया गेला . शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल ,कृषी ,ग्राम विकास यांच्या कडे ५० टक्केही कर्मचारी नाहीत अशा परिस्थिती जिल्हा प्रशासन अपुरी माहीती वातानुकूल मंत्रालयात पाठवीत आहे .मुख्य  मंत्री ,उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री हे कोणत्याही नापिकीग्रस्त भागात दिसत नसुन विरोधी पक्ष फक्त निवेदन देत असल्याचे विदारक चित्र आहे ,असा अनुभव किशोर तिवारी यांनी पश्चिम विदर्भ व मराठवाड्याचा दौरा केल्यावर व्यक्त केला आहे . 

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या कृषी मंत्री व कृषी सचिव ,कृषी आयुक्त यांनी पाहणी दौरा न करता ही तातडीची मदत कोणत्या आधाराने घोषित केली न समजणे कठीण आहे जर ही मदत ३१ लाखावर शेतकऱ्यांना सरासरी ७ हजार दराने कशी काय घोषीत करण्यात आली आहे एकूण नापिकीग्रस्त शेतकरी ६८ लाखांवर आहेत यातून कोणाला देणार या प्रश्न किशोर तिवारीं उपस्थित करून जे नेते विरोधात असतांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी करीत होते ते आता हेक्टरी ३ ते ४ हजार रुपये घोषित करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत आहेत असा आरोप करीत फक्त कमिशन खाण्यासाठी समृद्धी मेट्रो सारखे प्रकल्प आणून १० लाख कोटी रुपयाचे कर्ज काढणाऱ्या देवाभाउने आपल्या लाडक्या बहिणीचे कुंकू वाचविण्यासाठी आता आणखी १ लाख कोटीचे कर्ज घ्यावे ,ही हात जोडून विनंती केली आहे . 

===========================================================






Comments

Popular posts from this blog

१० हजार कटुबांना दिवाळी भेट कार्यक्रम -दानशुर किसनभाऊ बोरेले यांचा पुढाकार

"अल्पसंख्यक और अमराठी-भाषी लोगों के खिलाफ भाषा/प्रांतवाद का जहरीला एजेंडा चलाने वाले श्री राज ठाकरे के साथ गठबंधन पर पुनर्विचार जरूरी ! "-शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे को शिवसेना के अपदस्थ प्रवक्ता किशोर तिवारी का खुला पत्र !

शपथपत्रावर सर्रास खोटे बोलणाऱ्या श्रद्धेय सत्यवचनी अंजलीताई दमानिया यांनी खुलासा करावा -किशोर तिवारी