महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याची उपेक्षा केली -किशोर तिवारी
महाराष्ट्राच्या अर्थ संकल्पात आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्याची उपेक्षा केली -किशोर तिवारी
दिनांक -२८ जुन २०२४
महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी असलेल्या विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र येथील ३१ लोकसभा मतदार संघात महायुतीला संपूर्णपणे नाकारल्या नंतर व केंद्र सरकारने हमीभाव वाढीमध्ये निराशा केल्यांनतर महाराष्ट्र सरकार या वर्षी तीन महिन्यावर विधान सभेच्या निवडणुक असल्यामुळे कर्जबाजारी कोरडवाहू शेतकऱ्यांना तेलंगाणा सरकारप्रमाणे कर्जमुक्ती देतील व कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कमीतकमी प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपये भावांतर बोनस जाहीर करतील अशी अपेक्षा होती मात्र सरकारने प्रति क्विंटल जेमतेम १०० ते २०० बोनस जाहीर करून समस्यांच्या आगीत तेल टाकले आहे ,अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते व शिवसेना (उबाठा ) प्रवक्ते किशोर तिवारी यांनी अर्थ संकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केली .
कापूस व सोयाबीन तोटका बोनस जाहीर करून संकटाची महायुती सरकारने कबुली दिली
सरकारने कापसावर व सोयाबीनवर हमीभाव तोटका असल्यामुळे बोनस जाहीर केला मात्र तो तोटका म्हणून अर्थसंकल्पात यावर्षी प्रति हेक्टरी ५००० हजार रुपये बोनस देण्याची तरतूद केली याचा अर्थ प्रति एकरी २००० रुपये व सध्या कोरडवाहू क्षेत्रात येत असलेले उत्पादन लक्षात घेता प्रति क्विंटल जेमतेम १०० ते २०० बोनस जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते व शिवसेना (उबाठा ) प्रवक्ते किशोर तिवारी यांनी अर्थ संकल्पावर भावना व्यक्त करतांना व्यक्त केली .लोकसभा निवडणुकी दरम्यान प्रचारामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी सह भावांतर योजना जाहीर केली होती मात्र अर्थ संकल्पात याचा विसर पडल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला .
लाडली बहिणीसह मातेला सुद्धा कमीतकमी महिन्याची ५००० रुपये मदत देण्यात यावी
मध्यप्रदेश सारखी लाडली बहीण योजना जाहीर केली मात्र महिन्याला ८५०० रुपये खटाखट मिळणार या अपक्षेने भाजपाला नाकारलेल्या जनतेला कमीतकमी ५००० रुपये प्रति महीना त्याच बरोबर वयाची अट न ठेवता ही योजना जाहीर केली असती तर महागाई व बेरोजगारीमुळे त्रस्त ग्रामीण दिलासा मिळाला असता हि मदत तर उंटाच्या तोंडात जिरा असल्याची टीका किशोर तिवारी यांनी केली .
=============

Comments
Post a Comment