जून २०२६ मध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये ग्रामीण बचत गटांवरील कर्जांचा समावेश करा -किशोर तिवारी
जून २०२६ मध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मध्ये ग्रामीण बचत गटांवरील कर्जांचा समावेश करा -किशोर तिवारी दिनांक -९ फेबु २०२६ महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या २०२६ मध्ये जून महिन्यातील प्रस्तावित कर्जमाफीमध्ये सध्या शेती साठी पीककर्ज वाटप शेतकऱ्यांचे गट व देवाभाऊ यांच्या 'लाडक्या बहिणींच्या' नावावर बचतगटाच्या नावावर कृषी कर्ज मायक्रो फायनान्स कंपन्या ,सरकारी बँका,नागरी बँका व पत संस्था यांनी दिलेले पीककर्जाचे समावेश करण्यात यावा अशी मागणी नापिकीग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी मागील ३० वर्षांनी लढणारे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी प्रस्तावित कर्ज माफी स्थापन केलेल्या प्रविणसिंग परदेशी समितीकडे दिला आहे . मायक्रो फायनान्स कंपन्या व नागरी बँका नागरी पत संस्था यांचे ६० टक्के कृषी कर्ज वाटप सहकारी व सरकारी बँका यांचे पीककर्ज वाटप पश्चिम विदर्भ व मराठवाड्यात फक्त ४० टक्के असुन शेतीसाठी लागणारे भांडवल मायक्रो फायनान्स कंपन्या व नागरी बँका ,नागरी पत संस्था यांचे ६० टक्के कृषी कर्ज वाटप करीत असुन या सर्व नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना सरकारी प...