Posts

Showing posts from July, 2024

आर्थिक संकल्प २०२४-शिवसेना (उबाठा ) प्रतिक्रिया : केंद्राने महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा केली-किशोर तिवारीं

Image
आर्थिक संकल्प २०२४-शिवसेना (उबाठा ) प्रतिक्रिया : केंद्राने  महाराष्ट्राची संपुर्ण उपेक्षा केली-किशोर तिवारीं  दिनांक -२३ जुलै २०२४  एकीकडे महाराष्ट्राचे दिवाळखोर भ्रष्ट मिंधे सरकार आपल्या अर्थ संकल्पात सुमारे दीड लाख कोटीच्या सामाजिक सुरक्षेच्या योजना घोषित करतात त्यावेळी मात्र केंद्र सरकार  महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करून करतात महाराष्ट्रातील कर्ज बाजारी आत्महत्याग्रस्त कापूस सोयाबीन ८० लाख शेतकऱ्यांच्या कर्ज माफी ,कापसाच्या व सोयाबीनच्या नापिकीचा प्रश्न ,हमीभावाचा मुद्दा ,सिंचनाचा बॅकलॉग ,महागड्या वीज निर्मितीचा अडाणी प्रकोप यासाठी एकही दमडी न दिल्यामुळे भाजपचा पराजय येत्या विधान सभेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी निश्चित केल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा) चे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे  महाराष्ट्रात दररोज ८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी, अपूर्ण  प्रकल्प, मुंबई ,पुणे ,नागपुर  सह विदर्भ,मराठवाडा उत्तर महाराष्ट्र साठी विशेष निधी जाहीर झाला नाही यावर एक पैसाही दिला गेला नाही आंध्र बिहार सारखे विषेय पॅकेज निवडणीपूर्वी देणे गरजेचे ...

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात १ लाख कोटींचे पॅकेज द्यावे -शिवसेना (उबाठा )

Image
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात  १ लाख कोटींचे पॅकेज  द्यावे  -शिवसेना (उबाठा )   दिनांक -१७  जुलै २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येत्या पाच वर्षासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे व याच वेळी पश्चिम विदर्भाच्या कोरड वाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत व हा विषय पुन्हा राष्ट्रीय स्तरावर समोर येत आहे कारण २००१ ते जुलै २०२४ पर्यंत २७२३४ तर यावर्षी ६१८ शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयावर केंद्र सरकारने विषेय १ लाख कोटींचा एकात्मिक पश्चिम विदर्भ कृषी कल्याण कार्यक्रमाची घोषणा करावी अशी मागणी २००१ पासुन पश्चिम विदर्भाच्या शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते शिवसेना (उबाठा ) तर्फे किशोर तिवारी यांनी केले आहे . किशोर तिवारी २०१५ ते २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केंद्र व राज्य  सरकारला अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्मित कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन राज्यमंत्री देऊन नियुक्त केले होते व त्यांनी या विषयावर एकात्मिक अहवाल वारंवार दिला हो...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर करून एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दशकात भारत संपन्न झाला या दाव्याची सत्यता जगासमोर आणली

Image
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर करून  एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दशकात भारत संपन्न झाला या दाव्याची सत्यता जगासमोर आणली   दिनांक -४ जुलै २०२४  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना आणल्याबद्दल आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस  आणि अजित पवार  यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो कारण महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकार पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील दशकात भारत संपन्न झाला या दाव्याची सत्यता जगासमोर आणली आहे ,एकीकडे जो सर्वांना पोसणारा अन्नदाता याला फक्त ५०० रुपये सन्मान निधी दिल्यांनतर लाडकी बहीण योजना जाहीर करून राज्याचे जनतेची आर्थिक स्थिती व मोदींच्या संपन्न भारताची खरी परिस्थिती दाखविल्याबद्दल शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी धन्यवाद दिले आहे .  ज्या प्रमाणे राज्यभरातील कोट्यवधी गरीब महिला आता फक्त  अर्ज करण्यासाठी त्यांची सर्व कामे सोडून देत आहेत घरा  बाहेर पडत आहेत यावरून डबल इंजिन सरकार ने महाराष्ट्राची आर्थिक स्थितीची वाट लावली आहे,गेल्या 10 वर्षात कोट्यवधी नोकऱ्या देण्य...