पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी
पश्चिम विदर्भात २०२५ मध्ये विक्रमी २ हजारावर शेतकऱ्यांच्या आत्मह्त्या-सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणाचे बळी -किशोर तिवारी दिनांक -३१ जानेवारी २०२५ यावर्षी २०२५ मध्ये पश्चिम विदर्भात २००१ पासुन पहिल्यांदाच विक्रमी २००९ नापिकी ग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असुन ही जागतिक स्तरावर शेतकऱ्यांच्या नरसंहाराची सर्वात मोठी घटना आहे भाजप सरकार,प्रशासकीय यंत्रणा तसेच सर्वच राजकीय पक्ष मौन असुन संपुर्ण २०२५ वर्ष केवळ लोकसभा, विधानसभा,स्थानीय स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीच्या धामधुमीत गेला असुन सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासनाचा पाऊस पाडला मात्र शेतकरी आत्मह्त्या हा गंभीर विषय हवेत विरला अशी खंत शेतकरी आत्महत्या व कृषी संकट या गंभीर विषयावर मागील ३० वर्षापासून सतत कार्य करणारे कार्यकर्ते किशोर तिवारी व्यक्त केली . २०२५ मधील विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात जुन्या बेरार वा वऱ्हाड चे यवतमाळ ,अमरावती ,अकोला ,वाशीम ,बुलढाणा येतात व प्रशासकीय रित्या पूर्व विदर्भाचा वर्धा जिल्हा येतो.ब...