पश्चिम विदर्भात २००१ पासुन ३०९६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात १ लाख कोटींचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी
पश्चिम विदर्भात २००१ पासुन ३०९६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात १ लाख कोटींचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी दिनांक -३१ जानेवारी २०२५ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येत्या पाच वर्षासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आले आहे व याच वेळी पश्चिम विदर्भाच्या कोरड वाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत व हा विषय पुन्हा राष्ट्रीय स्तरावर समोर येत आहे कारण २००१ ते जुलै २०२४ पर्यंत ३०९६९ तर २०२४ मध्ये विक्रमी १२४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्या आहेत . मागील २४ वर्षात यवतमाळ जिल्ह्यात ८२१६ तर अमरावती जिल्ह्यात ६८६४ व बुलढाण्यात ५६५४ शेतकऱ्यांच्या ताम्हत्या झाल्या आहेत त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात ४२२८ तर वर्धा जिल्ह्यात ३४६७ तर वाशीम जिल्ह्यात २६४० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद आहे यामधील सिमारे ७० टक्के अत्म्हत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना सरकारने मदत नाकारली आहे तसेच ९० टक्के कुटुंबाना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही ,अशी व्यस्था २००१ पासुन पश्चिम विदर्भाच्या शेतकरी आत्म...