मुख्यमंत्र्यानी २ कोटी लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची सर्व गोपनीय माहीती सार्वजनिक केली - सर्व बहिणींना १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या -किशोर तिवारी -प्रवक्ते- शिवसेना ठाकरे गट
मुख्यमंत्र्यानी २ कोटी लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची सर्व गोपनीय माहीती सार्वजनिक केली - सर्व बहिणींना १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या - किशोर तिवारी -प्रवक्ते- शिवसेना ठाकरे गट दिनांक ११ ऑगस्ट २०२४ मागणी : "मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांची नावे, पूर्ण पत्ते, मोबाईल न, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, माहेर चे नाव, पत्ता आदी सर्व व्यक्तिगत स्वरूपाची गोपनीय माहिती सत्ताधारी राजकीय लोकांना लीक करून राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केलेला असून या योजनेत अर्ज करणाऱ्या भोळ्या भाबड्या महिलांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक स्वरूपाची गोपनीय माहिती सरकारने लीक केल्याने कायदेशीर एक लाख रुपये नुकसान भरपाई प्रत्येक महिलेस देण्यात यावी !"- किशोर तिवारी -प्रवक्ते- शिवसेना ठाकरे गट संकेत स्थळावर जा व दोन कोटी महिलांची अतिशय गोपीनिय माहीती फुकटात घ्या महाराष्ट्रात येत्या दोन/ तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून राज्यांतील एकनाथ शिंदे सरकारने लोकांना लुभाविनाऱ्या कथित कल्याणकारी योजनांच्या ना...